काही दिवसांपूर्वीच ईडीने सलग दहा-दहा तास अशी चार-पाच दिवस राहुल गांधी यांची चौकशी केली आहे, त्यानंतर सोनिया गांधी यांची तीन तास चौकशी ईडी कडून झाली आहे. सोनिया गांधी यांना आज पुन्हा चौकशीला हजर राहण्यासाठी ईडीने समन्स बजावलं आहे.
नॅशनल हेरॉल्ड गैरव्यवहार प्रकरणात काही दिवसांपूर्वीच राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना चौकशीसाठी ईडीने समन्स बजावलं होता. मात्र सोनिया गांधी या कोरोना पॉझिटिव्ह आल्याने त्या चौकशीला हजर राहू शकल्या नव्हत्या. तर राहुल गांधी हे ईडी समोर चौकशीला हजर राहिले होते.
सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या ईडी चौकशीवरून देशभरातील काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे चित्र ही दिसून आलं. देशभरात अनेक ठिकाणी काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. त्यांनी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे.