Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Friday, 18 April 2025
webdunia

कार्टोसॅट-3 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

Successful launch of the Cartosat-3 satellite
चेन्नई , गुरूवार, 28 नोव्हेंबर 2019 (11:22 IST)
पृथ्वीचे भूपृष्ठीय निरीक्षण आणि उच्च दर्जाची छायाचित्रे टिपणार्‍या कार्टो सॅट-3 या उपग्रहासह अमेरिकेच्या 13 अन्य व्यावसायिक नॅनो उपग्रहांचे बुधवारी सकाळी 9.28 वाजता यशस्वी प्रक्षेपण झाले. या प्रक्षेपणावेळी भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) चे प्रमुख के. सिवन श्रीहरिकोटा मिशन कंट्रोल कॉम्प्लेक्समध्ये उपस्थित होते. त्यांच्यासोबत या मिशनचे इंजिनीअर्स आणि इस्रोचे वरिष्ठ शास्त्रज्ञ उपस्थित होते. चांद्रयान 2 नंतरचे इस्रोचे हे पहिलेच लाँच आहे.
 
कार्टोसॅट - 3 ला भारताचा डोळा म्हटले जात आहे. कारण या उपग्रहाद्वारे मोठ्या स्तरावर मॅपिंग केले जात आहे. शहरांचे मॅपिंग या उपग्रहाद्वारे केली जाणार आहे. ग्रामीण भागातील मूलभूत सोयीसुविधांचे व्यवस्थापन करणे या मॅपिंगमुळे सुकर होणार आहे. हा कार्टोसॅट श्रृंखलेतील नववा उपग्रह आहे. श्रीहरीकोटा अवकाश केंद्रातील दुसर्‍या लाँच पॅडमधून याचे प्रक्षेपण करण्यात आले. पीएसलव्ही-सी47 मोहिमेच्या 'काउंटडाउन'ला मंगळवारी सकाळी 7 वाजून 28 मिनिटांनी श्रीहरीकोटा येथे सुरुवात झाली. पीएसएलव्हीसी47 हा उपग्रहवाहक आपल्या 49 व्या मोहिमेअंतर्गत 13 नॅनो उपग्रहांसह कार्टोसॅट-3 अवकाशात सोडणार आहे.
 
अवकाश विभागाच्या न्यू स्पेस इंडिया लि. सोबतच्या व्यावसायिक कराराचा भाग म्हणून अेरिकेचे 13
व्यावसायिक तत्त्वावरील नॅनो उपग्रहही प्रक्षेपित केले जाणार आहेत. याध्ये फ्लॉक-4पी श्रेणीतील 12
आणि मेशबेड या एका नॅनो उपग्रहाचा समावेश आहे. श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रावरील ही
74वी मोहीम असेल, असे इस्रोने म्हटले आहे.
 
कार्टोसॅट-3 उपग्रहाचा कार्यकाळ पाच वर्षांचा असेल. 22 जुलै रोजी झालेल्या चांद्रयान मोहिमेनंतर इस्रो कार्टो
सॅट-3 आणि अन्य व्यावसायिक नॅनो उपग्रहांचे प्रक्षेपण करत आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांची राजकीय मैत्री आणि किस्से