Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Tuesday, 8 April 2025
webdunia

पुजार्‍यांशी विवाह करणार्‍या महिलांना तीन लाखांचे बक्षीस

Telangana to offer Rs 3 lakh for women to marry temple priests
हैदराबाद- गेल्या दोन दशकात झालेल्या अगणित स्त्रीभ्रूण हत्येचे दुष्परिणाम आता दिसून लागले असून काही समजांमध्ये लग्नासाठी मुली मिळणे दिवसेंदिवस कठीण होऊ लागले आहे. यायाच परिणाम म्हणून तेलंगणामध्ये पुजार्‍यांशी विवाह करणार्‍या महिलांना तीन लाख रूपये दिले जाणार आहेत. तशी घोषणाच तलंगणा ब्राह्मण कल्याण संघटनेने केली आहे.
 
आर्थिक तंगीच्या कारणामुळे पुजार्‍यांना विवाहासाठी मुली मिळणे दुरापास्त होऊन बसले, अस तेलंगणाच्या ब्राह्मण कल्याण संघटनेचे म्हणणे आहे. त्यामुळेच अशा तरुण ब्राह्मणांना विवाहासाठी आर्थिक मदत देण्याची घोषरा करण्यात आली आहे. पुजार्‍यांचे अस्तित्व असेपर्यंतच मंदिर आणि संस्कृती अविरत राहील, ब्राह्मणांना मदत करण्यासाठी आणि त्यांच्या कल्याणसोबतच संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी या निर्णयाची आवश्यकता आहे, असे महाब्राह्मण संघटनचे म्हणणे आहे.
 
उल्लेखनीय म्हणजे तेलंगणा सरकारने आपल्या 2016 च्या बजेटमध्ये ब्राह्मणांच्या कल्याणासाठी 100 करोड रूपयांची तरतूद केली आहे, परंतू एखाद्याचा विवाह ही राज्याची जबाबदारी कशी असू शकते? जर कुणी एकटे राहत असेल तर ही सरकारची समस्या आहे का? विवाह पैशांशिवाय केले जाऊ शकत नाही काऊ? असे अनेक प्रश्न या निर्णयाचा विरोध करणार्‍यांनी उपस्थित केला.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

रेल्वे पुलांच्या दुरुस्तीसाठी सचिनकडून दोन कोटी