कावड मार्गावर दुकानदारांनी नेमप्लेट लावण्याच्या योगींच्या आदेशावर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला असून या निर्णयावर स्थगिती दिली असून दुकानदारांनी त्यांची ओळख उघड करण्याची गरज नसल्याचे सांगितले.
न्यायालयाने उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि मध्य प्रदेश सरकारांनाही नोटीस बजावली असून शुक्रवारपर्यंत उत्तर मागितले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, दुकानदारांना नावाची पाटी लावण्याची गरज नाही मात्र त्यांना खाद्य पदार्थ शाकाहारी आहे की मांसाहारी हे जाहीर करावे लागणार. या प्रकरणावर पुढील सुनावणी 26 जुलै रोजी होणार आहे.
कावड यात्रा मध्ये रस्त्यावरील दुकानदारांना त्यांच्या दुकानावर नेमप्लेट लावण्याच्या आदेश सरकार कडून देण्यात आला होता. या वरून गदारोळ झाला आणि प्रकरण न्यायालयात गेले. या प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी केली असून कावड मार्गावर असलेल्या दुकानदारांना आपल्या दुकानावर नेमप्लेट लावण्याची काही गरज नसल्याचे म्हटले. या प्रकरणात अनेक दुकाने हिंदूच्या नावावर असून तर मालक मुसलमान असल्याचे आढळून आले आहे.