Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

MP News : उज्जैन बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक, धावताना पायाला दुखापत

gang rape
, गुरूवार, 28 सप्टेंबर 2023 (20:09 IST)
उज्जैनमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. वृत्तानुसार, आरोपीचे नाव भरत सोनी असल्याचे सांगण्यात येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, धावताना त्याच्या पायाला दुखापत झाली. आरोपीला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
   
इन्स्पेक्टर अजय कुमार यांनी सांगितले की, गुन्ह्याच्या ठिकाणी रीक्रिएशन आणि मुलीचे कपडे जप्त करण्यासाठी ते घटनास्थळी गेले होते. भरत सोनी याने संधी मिळताच पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडले.
 
काय आहे संपूर्ण प्रकरण: मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये 12 वर्षांची मुलगी रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात सापडली. सुमारे अडीच तास मुलगी इकडे तिकडे भटकत राहिली. तिच्या  कपड्यातून रक्त वाहत होते. नंतर लोकांच्या मदतीने तिला रुग्णालयात नेण्यात आले. वैद्यकीय तपासणीत तिच्यावर बलात्कार झाल्याची पुष्टी झाली.
 
क्रूरांनी तिच्यावर इतके अत्याचार केले की तिच्या प्रायव्हेट पार्टला गंभीर दुखापत झाली. यानंतर तिला उपचारासाठी उज्जैन येथून इंदूरला रेफर करण्यात आले. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पंजाबमध्ये शेतकऱ्यांच्या रेल रोको आंदोलनामुळे फिरोजपूरमध्ये 18 गाड्या रद्द, 3 दिवस निदर्शने