Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

विजय रूपांनी गुजरातचे नवे मुख्यमंत्री; शपतविधी संपन्न

विजय रूपांनी गुजरातचे नवे मुख्यमंत्री; शपतविधी संपन्न
, मंगळवार, 26 डिसेंबर 2017 (16:32 IST)
गांधीनगर गुजरातची राजधानी येथे नव निर्वाचित रुपाणी सरकारचा शपथविधी सोहळा पूर्ण झाला आहे. यामध्ये नवीन सरकारमध्ये विजय रुपाणी यांनी मुख्यमंत्रिपदाची आणि नितीन पटेल यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. तर याचवेळी एकूण 20 जणांना राज्यपाल ओ. पी. कोहली यांनी पद आणि गोपनियतेची शपथ दिली आहे. या नवीन सरकारमध्ये 9 आमदार कॅबिनेट आणि 10 आमदार राज्यमंत्री म्हणून शपथबद्ध झाले आहे.विजय रुपाणी दुसऱ्यांदा गुजराथचे मुख्यमंत्री म्हणून विराजमान झाले आहेत. राजकोट पश्चिम या मतदारसंघाचं विजय रुपाणी निवडून आले आहेत. तसेच भाजपा अध्यक्ष अमित शहा यांचे ती निकटवर्ती आहेत. 2006 ते 2012 या काळात ते भाजपकडून राज्यसभेत खासदार होते. विजय रुपाणी मंत्रिमंडळात पाटीदार (6), ओबीसी (6), सवर्ण (4), दलित (1), जैन (1) आमदारांचा समावेश असून गुजरातच नवे मंत्रिमंडळ 
 
विजय रुपाणी (मुख्यमंत्री)  कॅबिनेट मंत्री : नितीन पटेल (उपमुख्यमंत्री), भूपेंद्रसिंह चुडासमा, रणछोडभाई फाल्दू, कौशिक पटेल, सौरभ पटेल 'गणपतभाई वसावा, जयेश राधडिया, दिलीप ठाकोर, ईश्वरभाई परमार
राज्यमंत्री : प्रदीपसिंह जाडेजा, परबतभाई पटेल, जयद्रथसिंह परमार, रमनलाल पाटकर, पुरुषोत्तम सोळंकी, ईश्वरसिंह पटेल, वासनभाई अहीर, किशोर कनानी, बचूभाई खबाड,विभावरी दवे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सेक्युलरिझमचा खरा अर्थ इतर धर्मांचा आदर करणे – प्रकाश राज