Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

विशाखापट्टणमध्ये विषारी वायू गळती, 8 जणांचा मृत्यू

विशाखापट्टणमध्ये विषारी वायू गळती, 8 जणांचा मृत्यू
, गुरूवार, 7 मे 2020 (13:17 IST)
आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणम येथील गोपालपट्टणम येथे गुरुवारी पहाटे एलजी पॉलिमर कंपनीत रासायनिक वायू गळती झाल्याची घटना घडली. यामुळे आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला आहे. तर शेकडो जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 
 
एलजी पॉलिमर कंपनीतून विषारी वायू गळती झाली. ज्यामुळे आसपासच्या तीन किलोमीटर अंतरावरील परिसरावर याचा परिणाम जाणवला. ही वायू गळती नेमकी कशामुळे झाली याचे अद्याप कारण स्पष्ट झालेले नाही. स्थानिक प्रशासनाने परिसरातील पाच गावं रिकामी केली आहेत. एनडीआरएफच्या पथकाकडून बचावकार्य सुरू आहे. दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
 
दरम्यान पंतप्रधान मोदींनी घटेनेबद्दल ट्विट करत म्हटले की घटनास्थळाच्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष दिले जात आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी देखील विशाखापट्टणम येथील परिस्थितीवर लक्ष असल्याचे सांगितले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

COVID-19: नागपूर ग्राऊंड रिपोर्ट