Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अभ्यास करा, जेईई परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्या

अभ्यास करा, जेईई परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्या
, मंगळवार, 5 मे 2020 (16:20 IST)
आयआयटीमध्ये प्रवेशासाठी आता जेईई मेन्स परीक्षा १८, २०, २१, २२ आणि २३ जुलैला आणि जेईई अॅडव्हान्स ऑगस्टमध्ये होणार आहे. तसेच, वैद्यकीय प्रवेश परीक्षा ‘NEET’ ही २६ जुलै रोजी होणार असून, सीबीएससीच्या दहावी व बारावीच्या परिक्षांबाबत लवकरच निर्णय होणार असल्यीची माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी दिली आहे. केंद्रीयमंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक हे वेबिनारच्या माध्यामातून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांना देशभरातील विद्यार्थांनी विविध प्रश्न विचारले. यावेळी त्यांनी वरील माहिती दिली. 
 
दरवर्षी लाखो विद्यार्थी मेडिकल आणि इंजिनिअरिंगच्या यूजी कोर्सेला प्रवेशासाठी ‘नीट’ आणि ‘जेईई’ मेन्स सारख्या परीक्षा देतात. या वर्षी देखील अशाचप्रकारे लाखो विद्यार्थ्यांना या परिक्षेची प्रतिक्षा होती. मात्र आता तारखा घोषित झाल्याने त्यांना त्यानुसार अभ्यासाचे नियोजन करता येणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कोरोना लॉकडाऊन: घरातलं अन्न संपलं म्हणून तिच्यावर मुलांसाठी दगड शिजवण्याची वेळ आली