Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
शुक्रवार, 20 दिसंबर 2024
webdunia

धर्मनगरी उज्जेनमध्ये रस्त्याच्या कडेला महिलेला दारू पाजून लैंगिक अत्याचार

crime against women
, शुक्रवार, 6 सप्टेंबर 2024 (10:18 IST)
मध्य प्रदेशमधील उज्जेनमध्ये मध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. उज्जेनमध्ये एका महिलेसोबत रस्त्यावर लैंगिक अत्याचार झाला. आरोपीने शहरातील कोयला फाटक चौकामध्ये फुटफाटवर महिलेवर लैंगिक अत्याचार केला. या घटनेला घेऊन काँग्रेसने प्रदेश सरकारला प्रश्न विचारले आहे. पोलिसांनी सांगितले की आरोपीला अटक करण्यात आली आहे.
 
पीडित महिला भीक मागून आपला उदरनिर्वाह करते. तिने पोलिसांनी आरोपीचे नाव लोकेश आहे असे सांगितले. आरोपी तिला फाटक जवळ भेटला होता. तिला लग्नाचे अमिश दाखवून पहिले दारू पाजली व तिच्या सोबत दुष्कर्म केले. मग धमकी देऊन फरार झाला. पोलिसांनी महिलेने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. 
 
प्रदेश काँग्रेस अध्यक्ष जितू पटवारी यांनी एक्स वर लिहले की, 'धर्मनगरी उज्जेन एकदा परत कलंकित झाली.' परत काळा डाग उज्जेन नगरीच्या कायदा व्यवस्थेवर लागला आहे. 
 
मागील वर्षी सप्टेंबर मध्ये देखील उज्जेनमध्ये एका लहान मुलीसोबत लैंगिक अत्याचार झाल्याचे प्रकरण समोर आले होते. रक्त बाबंबाळ झालेली चिमुरडी अडीचतास रस्त्यावर फिरत होते. या प्रकरणात रिक्षाचालकाला अटक करण्यात आली होती. 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

उद्धव ठाकरे राहुल गांधींच्या रॅलीला गेले नाहीत, खरगे म्हणाले- त्यांना फक्त 20 जागा मिळाल्या नाहीतर...