Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जिओ यूजर्ससाठी खुशखबर, 84 दिवस अनलिमिटेड कॉलिंगसह फ्री डेटा

जिओ यूजर्ससाठी खुशखबर, 84 दिवस अनलिमिटेड कॉलिंगसह फ्री डेटा
फारच कमी काळात जिओने आपले ग्राहक तयार केले आणि वेळोवेळी ऑफर देत ग्राहकांचा उत्साह टिकवून ठेवला. एकापेक्षा एक ऑफर देऊन अद्वितीय ओळख निर्माण करणारी जिओ कंपनी लवकरच प्रसिद्ध होऊन गेली. इतर कंपन्यांपेक्षा कमी किमतीत खूप ऑफर्स, बेनिफिट्स उपलब्ध करवत जिओने टेलिकॉम मार्केटमध्ये केवळ 2 वर्षात 28 कोटीहून अधिक ग्राहक जोडून घेतले आहेत.
 
आता ग्राहकांसाठी पुन्हा खुशखबरी म्हणजे जिओ ग्राहकांना कमी किमतीत अधिक काळासाठी वॅलिडिटी मिळेल. नवी ऑफरची किंमत केवळ 297 ठेवण्यात आली आहे परंतू आपल्याला ही ऑफर केवळ 247 रुपयात मिळेल. या ऑफरमध्ये ग्राहकांना प्रतिदिन 500 एमबी डेटा मिळेल. या ऑफरची वॅलिडिटी 84 दिवसासाठी असेल. वॅलिडिटीसह इतर बेनिफिट्स देखील आकर्षक आहे.
 
जिओ ग्राहकांना 84 दिवसासाठी डेटा व कॉलिंग सुविधा कमी किमतीत मिळेल. या ऑफर मध्ये ग्राहकांना लोकल व एसडीटी सर्व नंबर्सवर व्हॉईस कॉलिंग सुविधा 84 दिवसापर्यंत मिळेल. या व्यतिरिक्त 300 एसएमएस व रोमिंग सुविधा मोफत मिळेल. जिओ अॅप्स सब्स्क्रिप्शन देखील या ऑफरमध्ये मोफत मिळेल. ग्राहकांचा प्रतिदिन 4 जी स्पीड डेटा संपत असल्यास ग्राहकांना 65 केबीपीएसच्या स्पीडने अनलिमिटेड डेटा उपलब्ध राहील.
 
केवळ ₹247 मध्ये 84 दिवसांची वॅलिडिटी:-
 
जिओच्या ₹297 चा ऑफर केवळ ₹247 मध्ये प्राप्त करण्यासाठी ग्राहकांना माय जिओ अॅपहून रिचार्ज करावे लागेल. येथे रिचार्ज केल्याने जिओ ग्राहकांना जिओचे ₹50 चे एक व्हाउचरला देखील रिडीम करण्याचा फायदा मिळेल. अशाने 297-50=247 अर्थात हे रिचार्ज केवळ ₹247 मध्ये पडेल. अशाने जिओ ग्राहकांना केवळ ₹247 मध्ये 84 दिवसासाठी वॅलिडिटीसह डेटा व कॉलिंग मिळू शकेल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मोदींकडून देशातील जनतेचा विश्वासघात