Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बजट स्मार्टफोन ‘रेडमी 7A’ लाँच

बजट स्मार्टफोन ‘रेडमी 7A’ लाँच
शाओमीने भारतात लेटेस्ट बजट स्मार्टफोन ‘रेडमी 7A’ (Redmi 7A) लाँच केला आहे. रेडमी 7A मध्ये एचडी प्लस रिजोल्यूशनसह 5.4 इंचाचा आयपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन क्वॉलकम स्नॅपड्रॅगन 439 चिपसेटसह उपलब्ध आहे. यात नॅनो ड्युअल सिमची व्यवस्था असून एमआययूआय 10 वर आधारित आहे. या स्मार्टफोनमध्ये अँड्रॉईड 9 पाय ऑपरेटिंग सिस्टम देण्यात आली आहे. तसेच बॅटरीची क्षमता 4000 एमएएच एवढी आहे.
 
रेडमी 7A 2 जीबी रॅम + 16 जीबी इंटरनल स्टोरेज आणि 2 जीबी रॅम + 16 जीबी इंटरनल स्टोरेज वेरिएंटमध्ये उपलब्ध होईल. यूजर मायक्रोएसडी कार्डचा उपयोग करुन स्टोरेज स्पेस 256 जीबीपर्यंत वाढवू शकतात. या स्मार्टफोनमध्ये 12 मेगापिक्सलचा Sony IMX486 रिअर कॅमेरा आहे. त्यात फेस डिटेक्शन आणि ऑटोफोकस फीचरही उपलब्ध आहे. स्मार्टफोनमध्ये एआय फेस अनलॉकची (AI Face Unlock) व्यवस्थाही देण्यात आली आहे. तसेच फ्रंटला 5 मेगापिक्सल कॅमेरा आहे.
 
भारतात रेडमी 7A च्या 2 जीबी रॅम आणि 16 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 5,999 रुपये आहे. तसेच 2 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 6,199 रुपये आहे. हा फोन मॅट ब्लॅक, मॅट ब्लू आणि मॅट गोल्ड अशा 3 रंगांमध्ये उपलब्ध होणार आहे. लाँच ऑफरमध्ये Redmi 7A स्मार्टफोनच्या दोन्ही वेरिएंटच्या किमतीत 200 रुपयांची सुट मिळणार आहे. हँडसेटची सुरुवातीची किंमत 5,799 रुपये ठेवण्यात आली आहे. ही ऑफर केवळ जुलैपर्यंत लागू असणार आहे. Redmi 7A ची विक्री 11 जुलैला दुपारी 12 वाजल्यापासून होईल. हा फोन फ्लिपकार्ट, एमआय डॉट कॉम आणि एमआय होम स्टोअर्समध्ये उपलब्ध होईल. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मच्छिमाराच्या गळाला दुर्मिळ मासे, मिळाली मोठी किंमत