Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राष्ट्रपती पदाच्या निवडणूक तयारीची पाहणी करण्यासाठी अधिकारी नियुक्त

राष्ट्रपती पदाच्या निवडणूक तयारीची पाहणी करण्यासाठी अधिकारी नियुक्त
, गुरूवार, 14 जुलै 2022 (08:25 IST)
भारत निवडणूक आयोगामार्फत दिनांक 18 जुलै 2022 रोजी राष्ट्रपती पदाकरिता निवडणूक होत आहे. यासाठी महाराष्ट्रात होत असलेल्या निवडणुकीची पाहणी करण्यासाठी श्रीमती दीपाली मसीरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
 
महाराष्ट्र विधानभवन, मुंबई येथे होणाऱ्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसंदर्भात श्रीमती मसीरकर ह्या दिनांक 17 जुलै रोजी दुपारनंतर मुंबईत येत असून त्या निवडणुक तयारीच्या कामकाजाची पाहणी करतील.
 
या निवडणुकीकरिता भारत निवडणूक आयोगाने आवश्यक सामग्री जसे मतपेटी, मतपत्रिका, पेन आदी साहित्य दिनांक 12 जुलै 2022 रोजी महाराष्ट्र विधानमंडळ, मुंबई येथे पाठविले आहे. हे सर्व साहित्य विधानभवनातील स्ट्राँग रूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आले आहे, अशी माहिती अपर मुख्य सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

वसई दरड दुर्घटना: मृतांना प्रत्येकी ६ लाख रुपये - मुख्यमंत्री