Publish Date: Wed, 02 Mar 2022 (13:26 IST)
Updated Date: Thu, 29 Sep 2022 (18:29 IST)
पुण्यामध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे. शौचालयाची टाकी साफ करताना चार तरुण टाकीत पडले. या प्रकरणात, तीन जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. पुण्यातील लोणी काळभोर परिसरातील हॉटेल प्यासाजवळ ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, या घटनेत सहभागी तरुणाला वाचवण्यात पोलीस आणि अग्निशमन दलाला यश आले आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.