भडकाऊ भाषण करून समाजात तेढ निर्माण होईल आणि लोक भडकतील असे भडखाऊ भाषण करून दोन समाजात तेढ निर्माण होईल असे वक्तव्य केल्या प्रकरणी हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे, कालिचरण महाराज यांच्या सह एकूण सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्यातील नातूबाग मैदानात आयोजित कार्यक्रमात त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 19 डिसेंबर रोजी नातूबागेत शिवप्रताप दिनाच्या निमित्त झालेल्या कार्यक्रमात अफजलखानवध निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असता. मिलिंद एकबोटे, कमिचारां महाराज यांच्यासह इतर वक्ते देखील होते. या कार्यक्रम मिलिंद एकबोटे आणि कालिचरण महाराज यांनी भाषणे केली. यांनी आपल्या भाषणात चिथावणीखोर आणि भडखाऊ वक्तव्य दिले .या मुळे दोन समाजात तेढ निर्माण होईल आणि लोक भडकतील. अशी तक्रार यांच्या विरोधात करण्यात आली आहे. या प्रकरणी खडक पोलीस ठाण्यात हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे आणि यांच्यासह 6 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडे या तक्रारी आणि भाषणाची क्लिप देण्यात आली आहे. त्याची पडताळणी केल्यावर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगितले आहे