Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Thursday, 1 May 2025
webdunia

पुण्यात लॉकडाऊन संपला, मात्र काळजी नाही, शहर 'या' दिवशी राहणार बंद

Lockdown
, शुक्रवार, 24 जुलै 2020 (09:13 IST)
पुण्यात काल 23 जुलै हा पुलॉकडाऊनचा शेवटचा दिवस होता. पण आज पासून (२४ जुलै रोजी पासून लॉकडाऊन असणार आहे की नाही किंवा काही अटी-नियम लागू होणार आहेत याबबात जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. पुण्यातील कोरोनाची स्थिती पाहता काही निर्बंध लागू असणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली आहे. विशेष म्हणजे शनिवार आणि रविवार या दोन दिवशी इथून पुढे लॉकडाऊन घालण्याचा विचार असल्याच त्यांनी सांगितले.
 
पुण्यात ४८ व्हेंटीलेटर्स लोकांसाठी उपलब्ध आहेत. पुण्यात बेडची कोणतीही कमतरता नाही असा दावा त्यांनी केला आहे. पुण्यातील १० दिवसांच्या लॉकडाऊनचे फायदे येत्या काही दिवसांमध्ये दिसतील. रुग्णांची साखळी तुटल्याने रुग्ण संख्या काही दिवसांनी कमी येईल अशी अशा त्यांनी व्यक्त केली आहे.
 
लॉकडाऊनच्या दहा दिवसांच्या कालावधीत १ लाखांहून अधिक टेस्ट केल्या आहेत. टेस्ट वाढवल्याने रुग्णांची संख्या वाढल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांनी लग्न समारंभात किती लोकांना उपस्थित राहण्यास परवानगी द्यायची याचा विचार सुरू असल्याचे सांगितले. लग्न समारंभांसाठी आधी ५० व्यक्तींना परवानगी दिली होती, पण आता लग्नासाठी आणखी कमी लोकांना उपस्थितीत राहण्याची परवानगी देण्याचा विचार आहे असं ते म्हणाले आहेत. गर्दी टाळण्यासाठी काही निर्बंध घालण्याची गरज आहे असेही ते म्हणाले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कारगिल युद्ध : मेंढपाळ्यापासून अन्न वाचविणे पाकला पडले भारी, अश्या प्रकारे कट कारस्थानाचे झाले प्रकटीकरण ...