Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लॉक डाउन नंतर ऑफिसात परिधान केलेल्या कापड्यांना निर्जंतुक कसं करावं, जाणून घेऊ या काही टिप्स

लॉक डाउन नंतर ऑफिसात परिधान केलेल्या कापड्यांना निर्जंतुक कसं करावं, जाणून घेऊ या काही टिप्स
, शुक्रवार, 17 जुलै 2020 (19:46 IST)
आपण पुन्हा ऑफिसात जाणे सुरू केलेत का ? तर खालील दिलेल्या टिप्स आवर्जून वाचा, जेणे करून आपण याचा साहाय्याने ऑफिसात घालून जाणाऱ्या कापड्यांना निर्जंतुक करू शकाल.
 
लॉक डाउन उघडल्यावर, आता ऑफिस आणि कामाचे स्थळ हळू-हळू पुन्हा सुरू होत आहे. आपण या वास्तविक दिनचर्येला बघून आनंदित होत असाल, पण ऑफिसातून घरी परत येताना आपण आपल्या बरोबर जंतू आणि संसर्ग आणत तर नाही, याची काळजी देखील असणारच. पण आपणास काळजी करावयाची काही ही गरज नाही. कामाला जाताना स्वच्छतेशी निगडित काही आवश्यक सावधगिरीबद्दल जाणून घ्या आणि त्याच बरोबर घरातून बाहेर जाणाऱ्या वस्तू जसे की - ऑफिसात घालून जाणारे कापडं, बॅग, बूट, चाबी, फोन, पाकीट, टिफिन बॅग इत्यादींच्या साफ स्वच्छते विषयी माहिती घ्या. चला तर मग जाणून घेऊया ऑफिसात घालून जाणार्या कापड्यांना निर्जंतुक कसं बनवायचं.
 
ऑफिसात किंवा बाहेर घालून जाणाऱ्या कापड्यांना सेनेटाईझ करण्याची काय गरज आहे ? कारण की आपल्याला हे माहितीच आहे की जंत शिंकल्या किंवा खोकल्यावर काही फुटांपर्यंत दूरवर पसरतात आणि आपल्या आजूबाजूच्या पृष्ठभागावर, कपड्यांवर पोहोचतात. स्पर्शाने देखील ते पसरतात. आपल्या बरोबर काम करणारा सहकारी आजारी असल्यास, खोकलतांना किंवा शिंकताना आपल्या हाताने तोंड झाकत असल्यावर आणि मग तेच हात आपल्या कापड्यांना लावल्यावर किंवा आपण अश्या जागेवर बसता, ज्यावर बसून त्याआधी कोणी खोकलले असणार, तर ते जंतू आपल्या कपड्यांनवर पोहोचतात. या जंतू आणि संसर्गापासून आपल्या कुटुंबीयांना सुरक्षित ठेवण्याचे आणि आपल्या कापड्यांना स्वच्छ आणि निर्जंतुक करण्याचे सोपे उपाय माहीत करून घ्या.
 
ऑफिसचे कपडे आणि सामान जंतूंपासून दूर ठेवण्यासाठी सर्वात आधी कोणत्याही आजारी माणसाच्या संपर्कात येणं टाळावं. कामावर किंवा प्रवास करताना, प्रत्येकापासून किमान 6 फुटाचे अंतर राखावं. जरी त्या माणसात  काहीही लक्षण आढळत नसल्यास तरी देखील आपण हे करण्यात यशस्वी झालास तरी ही ऑफिसात घालून जाणारे कपडे दर रोज धुवावे. 
 
दररोज आपण ज्या कापड्यांना निर्जंतुक करता त्यामध्ये कापड्याचे असे सामानाचा समावेश करा, जे आपण ऑफिसात जाताना वापरता, जसं की स्कार्फ, स्टोल, रुमाल, जाकीट, ओढणी आणि तोंडाला लावायचा कापडी मास्क. 
इथे आपणास ऑफिसात घालून जाणाऱ्या कापड्यांना धुवण्याचा काही सोप्या टिप्स सांगत आहोत.
 
जर आपण फ्रंट लाइन हेल्थ वर्करचे कापडं धुवत असल्यास हातात डिस्पोझेबल ग्लोव्ज आवर्जून घाला. वापर झाल्यावर त्या ग्लोव्जची विल्लेवाट लावा आणि आपले हात साबणाने किंवा एल्कोहल बेस्ड सेनेटाईझरने धुऊ शकता. हे बाजारात सहजच मिळतं.
 
1 ऑफिसातील कापडे कसं धुवावे : जर आपले कार्यालय जोखीम क्षेत्रात येत नसल्यास किंवा आपण विणा जोखमी कार्यालयात (क्लिनिक,रुग्णालयात, लॅब)इत्यादींना सोडून काम करत असाल तर, ऑफिसात घालून जाणारे कापड्यांना चांगल्या प्रकाराच्या डिटर्जंटने धुवावे. 
 
आपण अश्या कोणत्या जागी काम करता, जेथे संसर्गाचा धोका जास्त असतो, जसे की रुग्णालय, क्लिनिक, पोलीस फोर्स, पॅथलॅब इत्यादी, तर चांगल्या प्रकारच्या स्वच्छतेसाठी आपल्या हाय रिस्क किंवा उच्च जोखीम असलेल्या कापड्यांना गरम पाण्याने धुवा आणि डाग स्वच्छ करण्यासाठी सामान्य पाण्याचा वापर करावा. हाय रिस्क किंवा उच्च जोखिमी कपडे असे असतात जे कोणा संसर्गजन्य असलेल्या माणसाच्या संपर्कात आले असणार किंवा ज्या कपड्यांवर डाग (रक्त, मूत्र, मळ, उलटी)चे असतात.
 
आपण या कापड्यांना वेगळं ठेवून त्यांना धुणं जास्त चांगले असेल. आपण ह्यांना धुतल्यावर लॉंड्री सेनेटाईझर ने सेनेटाईझ देखील करू शकता.
 
जर आपण कापडं धुण्यासाठी वाशिंग मशीन वापरात असल्यास, तर उच्च जोखमीच्या कापड्यांना लांब वॉश सेटिंग आणि एक्स्ट्रा रिंस वर धुवा. कापड्यांना चांगल्या प्रकारे धुण्यासाठी मशीनला ओव्हरलोड करू नका. कपडे फिरण्यासाठी पुरेशी जागा ठेवा.
 
2 ऑफिसातील कपडे कसे वाळवावे : लक्षात ठेवा, जेव्हा आपण कपडे घडी घालत असाल, तर ते ओलसर नसावे. ओले असल्यास त्यात जंतू आद्रतेमुळे वाढू शकतात. कापडं उन्हात चांगल्या प्रकारे वाळवून घ्यावं. जर आपण घरात कपडे वाळवत असाल, तर या टिप्स वापरा.
 
* कापडं ड्रॉईंग रॅक वर टांगून उन्हात वाळवा.
* वायुविजन वाढविण्यासाठी घरातील सर्व खिडक्या उघडा.
* कपडे लवकर वळविण्यासाठी त्यांना कोटाचा हँगर वर लटकवा.
* कापडं अश्या जागी वाळवा जेथे आपले जास्त वापर नसेल. त्यामुळे बीजाणू तेथे जाऊ शकणार नाही. शक्यतो बेडरूम आणि लिविंग रूम मध्ये वाळवू नका.
* टम्बल ड्रॉयर असल्यास, कापडं वळविण्यासाठी लांब ड्रॉईंग चक्राचा वापर करावा. जेणे करून कापडं लवकर वाळतील.
 
3 ऑफिसचे कपडे स्वच्छ राखण्यासाठी त्यांना दररोज धुवावं : आपण वर्दळीच्या ठिकाणी किंवा हाई रिस्क असलेल्या क्षेत्रात असलास किंवा सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करीत असाल, तर आपण आजारी माणसाच्या संपर्कात येण्याची दाट शक्यता असते. म्हणून घरी गेल्यावर त्वरितच कपडे धुवावे. त्यांना लॉन्ड्रीच्या बॅकेटात टाकू नका, या मुळे जंतू पसरू शकतात. सामान्यतः जे कपडे आपण एकदा बाहेर घालून गेला असाल तर ते न धुता घालू नका.  
 
4 वॉशिंग मशीन कशी स्वच्छ करावी : जर आपण ऑफिस घालून जाणाऱ्या कापडं आणि ऑफिसात घेऊन जाणाऱ्या दुसऱ्या सामानाला वॉशिंग मशीन मध्ये धुवत असल्यास, मशीनला देखील चांगल्या प्रकारे स्वच्छ करणं गरजेचे आहे. कारण वॉशिंग मशीन घाण असल्यास तर त्यात किती जंतू असणार आणि मशीनचा वापर करताना पुन्हा ते किटाणू मशीन मधून कापड्यांना लागू शकतात अश्या परिस्थितीत वॉशिंग मशीन कश्या प्रकारे स्वच्छ करावी, हे जाणून घेणे देखील गरजेचे आहे. लक्षात ठेवा प्रत्येक वेळी वापर केल्यावर वायुविजन साठी मशीनला  किमान अर्धातास उघडून ठेवावं.
 
कपडे धुताना आणि धुतल्यावर देखील आपले हात स्वच्छ धुवावे. त्याच बरोबर कापडं वाळत घालताना झटकू नये. कारण असे केल्यास जंतू आपल्या श्वासातून आपल्या शरीरात जाऊ शकतात. जेव्हा कपडे धुण्यासाठी घेऊन जाल तेव्हा कपडे आपल्या अंगापासून लांब ठेवा आणि हातांना लगेच धुऊन घ्या. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बकरी ईदसाठी राज्य सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी