Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पुण्यातील बेकायदेशीर मशिदी आणि मदरशावर कारवाई, ओविसी संतापले

Asaduddin Owaisi
, सोमवार, 30 सप्टेंबर 2024 (13:20 IST)
सध्या देशात बेकायदेशीर मशिदींबाबत गदारोळ वाढत आहे. आता पुण्यात बेकायदेशीर मशिदी आणि मदरशांवर  कारवाई करण्यात आली असून त्यांच्यावर बुलडोझर चालविण्यात आले आहे. महानगर पालिकेने मध्यरात्रि बेकायदा बांधकामावर कारवाई केली आहे. पिंपरी- चिंचवड मधील सर्व बेकायदेशीर धार्मिक स्थळे पाडण्याचे उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर महापालिकेने ही कारवाई केली आहे. 

महापालिकेने सहा महिन्यांपूर्वी सर्व बेकायदेशीर बांधकाम असलेल्या धार्मिक स्थळांना नोटीस बजावली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले गेले. आता महापालिकेने ही कारवाई केली आहे. या कारवाईवर मुस्लिमांचा तीव्र विरोध केला जात आहे. मदरशा  आणि मस्जिद वाचविण्यासाठी मुस्लिम समाजाचे अनेक लोक मोठ्या संख्येत या ठिकाणी जमले. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस प्रशासन तैनात होते. आंदोलन दरम्यान काही जणांना  ताब्यात घेतले नंतर त्यांना सोडण्यात आले. 

या प्रकरणी AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, पुण्यात फक्त एक मशीद पाडली जात आहे. मशिदीच्या आजूबाजूची हजारो घरे देखील बेकायदेशीर आहे. त्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही. केवळ मशीद दारुलम जामिया इनामिया पाडण्यात आली आहे. असा भेदभाव का ? असा प्रश्न त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केला आहे.   
Edited by - Priya Dixit  
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बहिणाला बुडतांना वाचवण्यासाठी गेलेल्या बहिणींचा नदीत बुडून मृत्यू