Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पुण्यात भीषण कार अपघातात दोन ट्रेनी पायलटच्या दुर्देवी मृत्यू

पुण्यात भीषण कार अपघातात दोन ट्रेनी पायलटच्या दुर्देवी मृत्यू
, सोमवार, 9 डिसेंबर 2024 (16:17 IST)
पुण्यात भीषण कार अपघात दोन ट्रेनी पायलटच्या मृत्यू झाला आणि दोघे जखमी झाल्याचे वृत्त समोर आले आहे. पुणे जिल्ह्यात बारामती भिगवण रोडवर जैनीकवाडी गावाजवळ रात्री साडेतीनच्या सुमारास हा भीषण रस्ता अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. कार झाडाला आदळून हा अपघात झाला. या कार मधून चौघे जण तपास करत होते. त्यापैकी मयत झालेले दोघे प्रशिक्षणार्थी वैमानिक होते. तक्षू शर्मा आणि आदित्य कणसे अशी या घटनेतील मृतांची नावे आहेत. दोघेही 21 वर्षांचे असून बारामती येथील रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग ॲकॅडमीमध्ये प्रशिक्षणार्थी वैमानिक होते.

अपघातापूर्वी कारमधील लोकांनी पार्टी केली होती. या पार्टीदरम्यानच त्याने ड्रग्ज घेतले होते. यानंतर दारूच्या नशेत गाडी चालवल्याने हा अपघात झाला. पोलिसांना अपघाताची माहिती मिळाल्यावर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात एवढा भीषण होता की ट्रेनी पायलटांचा जागीच मृत्यू झाला. तर इतर दोघे गंभीर जखमी झाले. अपघाताच्या आधी या चौघांनी त्यांच्या खोलीत एक पार्टी केली होती. त्यात त्यांनी मद्यपान केले. नंतर भरधाव वेगात त्यांनी गाडी पळवली आणि एका वळणावर येऊन गाडी अनियंत्रित होऊन वाहन चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि वाहन एका झाडाला जाऊन आदळली आणि पलटी झाली.  

यामधील दोघांचा जागीच मृत्यू झाला तर कृष्णा सिंग आणि चेष्टा बिश्नोई हे दोघे गंभीर जखमी झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले असून जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे. पोलीस पुढील तपास करत आहे. 
Edited By - Priya Dixit
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

रावेत येथे सॉफ्टवेअर इंजिनिअरची ऑनलाईन सात लाखांची फसवणूक