Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुंबईत टॅक्सीचालकांचा बंद; लोकल कोलमडली

मुंबईत टॅक्सीचालकांचा बंद; लोकल कोलमडली
मुंबई , मंगळवार, 21 जून 2016 (17:03 IST)
ओला, उबर यासारख्या टॅक्सीसेवांवर निर्बंध आणण्याच्या मागणीसाठी दक्षिण मुंबईत टॅक्सी चालकांनी बंद पुकारला आहे.

आझाद मैदानावर जवळपास एक हजार टॅक्सी चालकांनी आंदोलनात सहभाग घेतला आहे. या बंदमध्ये वेगवेगळ्या टॅक्सीचालक संघटना सहभागी झाल्या आहेत.

दरम्यान, मुंबईत काल रात्री पडलेल्या मुसळधार पावसाने तिन्ही मार्गावरच्या वाहतूक सध्या विस्कळीत झाली. मध्य रेल्वेवर भांडुप ते विक्रोळी स्थानकादरम्यान रेल्वे ट्रॅकमध्ये पाणी साचल्यामुळे जलद मार्गावरची वाहतूक धीम्या मार्गावर वळवण्यात आली. मध्य रेल्वेच्या दिवा स्थानकात एकही लोकल न आल्यानं संतापलेले प्रवासी रेल्वे रुळावर ठाण मांडून बसले. लोकलच नसल्याने कल्याण, डोंबिवली आणि ठाणे स्थानकांवरही मोठी गर्दी झाली.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सिम न बदलता करा दुसर्‍या नंबरवरून कॉल