Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अलिबाग :बोगस प्रमाणपत्र देऊन रायगड पोलीस दलात आठ वर्ष नोकरी केली ; अखेर गुन्हा दाखल

maharashtra police
, मंगळवार, 18 जुलै 2023 (08:46 IST)
अलिबाग प्रकल्पग्रस्त असल्याचा बोगस प्रमाणपत्र तयार करून रायगड पोलीस दलात त्यांने तब्बल आठ वर्ष नोकरी केली. शेवटी त्यांचे बिंग फुटले आणि त्याला जेलची हवा खाण्याची वेळ आली. सिध्देश पाटील असे त्याचे नाव असून अलिबाग तीनविरा येथील रहिवासी आहे. सध्देश याने बीड जिल्ह्यातून प्रकल्पग्रस्त असल्याचा बोगस प्रमाणपत्र तयार करून घेतला होते. २०१६ साली रायगड जिल्ह्यात भरती प्रक्रिया झाली होती. या भरती प्रक्रियेत सिध्देश याने प्रकल्पग्रस्त म्हणून अर्ज केला होता. भरतीमध्ये तो प्रकल्पग्रस्त म्हणून पात्र होऊन रायगड पोलीस दलात पोलीस शिपाई म्हणून रुजू झाला.
 
२०१६ ते २०२३ या कालावधीत जिल्ह्यात विविध ठिकाणी काम केले. २०२३ मध्ये गडचिरोली जिल्ह्यात झालेल्या पोलिस भरतीत गडचिरोली स्थानिक गुन्हे विभागाने बोगस प्रमाणपत्र प्रकरण उघडकीस आणले होते.

या प्रकरणात पोलीस शिपाई सिध्देश पाटील याचाही सहभाग असल्याने गडचिरोली पोलिसांनी अलिबाग येथून अटक केली. सिध्देश याच्या विरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात भा.दं.वि.क.४२०,४६७,४६८,४७१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास सपोनी. महेश कदम स्थानिक गुन्हे अन्वेशन रायगड अलिबाग हे करीत आहेत. सिध्देश गेली आठ वर्ष पोलीसात नोकरी करीत होता. त्यामुळे या काळात दिलेले
वेतन आणि इतर भत्ते हे वसूल केले जाण्याची शक्यता आहे.
 
Edited By - Ratnadeep ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पावसाळी सहलीसाठी गेलेले अलिबाग-थेरोंडा येथील दोन सख्खे भाऊ बुडाले