Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कोरोनाशी झुंज देणा-या महिलेकडे घरफोडी करणारा अटकेत

कोरोनाशी झुंज देणा-या महिलेकडे घरफोडी करणारा अटकेत
, शनिवार, 10 एप्रिल 2021 (08:02 IST)
रुग्णालयात कोरोनासोबत संघर्ष करणा-या महिलेच्या असहायतेचा गैरफायदा घेत घरफोडी करणा-या चोरट्याला जळगाव एलसीबीच्या पथकाने ताब्यात घेत अटक केली आहे. अमळनेर शहरातील आर.के.पटेल कंपनी परिसरात राहणा-या उद्योजक महिलेकडे 2 एप्रिल रोजी सदर घरफोडीचा प्रकार घडला होता.
 
अमळनेर येथील खासगी रुग्णालयात कोरोनासोबत झुंज देणा-या महिलेचे घर 2 एप्रिल रोजी कुलुपबंद होते. घरातील इतर महिलांना कोरोना विषाणूची लागण होऊ नये म्हणून त्यांना विलगीकरणासाठी इतरत्र बाहेरगावी रवाना करण्यात आले होते. त्यामुळे सदर उद्योजक महिलेचे घर बंद होते. या बंद घराचा 2 एप्रिल रोजी कडीकोंडा तोडून हॉल व बेडरुम मधील लोखंडी कपाटातून 1 लाख 92 हजार 500 रुपयांचे सोन्या चांदीचे दागीने व रोख रक्कम चोरट्याने चोरुन नेण्याचा प्रकार घडला होता. चोरीच्या या घटनेप्रकरणी अमळनेर पोलिस स्टेशनला अमळनेर पोलिस स्टेशनला भाग 5 गु.र.न. 159/21 भा.द.वि. 454, 457, 380 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
 
या गुन्ह्याच्या समांतर तपासात स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार बकाले यांनी आपल्या सहका-यांच्या मदतीने तपास सुरु केला होता. तपासादरम्यान अमळनेर शहरातील शेख रफीक उर्फ काजल शेख रशीद (38) रा.जुना सिव्हील हॉस्पीटलच्या बाजुला बॉम्बे गल्ली अमळनेर व त्याच्या साथीदारांनी हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. शेख रफीक उर्फ काजल शेख यास शिताफीने ताब्यात घेत चौकशी करण्यात आली. त्याने दिलेल्या माहितीनुसार त्याच्या इतर तिन साथीदारांची नावे उघड झाली. या गुन्ह्यातील चोरी झालेल्या मुद्देमालापैकी 38 हजार 500 रुपये रोख 14 हजार 410 रुपये किमतीचे सोन्याचे दोन कानातील टॉप्स अटकेतील शेख रफीक उर्फ काजाल याच्याकडून हस्तगत करण्यात आले आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांकडून महिलांचे दागिने चोरणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर ‘मोक्का’ !