राज्य सरकार ने आज पासून प्लास्टिकच्या वस्तूंच्या वापरावर बंदी घालण्याची घोषणा केली आहे. प्लास्टिकच्या वापर बाबत मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पर्यावरण विभागासोबत बैठक केल्यानंतर शिंदे यांनी एक जुलैपासून लागू करण्यात आलेल्या सिंगल -यूज प्लास्टिक बंदीच्या अंमलबजावणीसाठी समितीची स्थापना करण्यात आली होती त्या समितीने प्लास्टिक वापर बाबत शिफारशी केली होती त्याला मान्यता देण्यात आली असून आता नव्या नियमानुसार प्लास्टिकच्या वस्तूंच्या उत्पादनाला आयात,निर्यात आणि वस्तूंच्या वापरांवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. या नियमांचं उल्लंघन केल्यास कठोर दंडाची तरतूद करण्यात आली आहे.
समिती ने 18 जुलैरोजी झालेल्या बैठकीत प्लेट्स, कप, चमचे, ग्लास आणि इतर वस्तू ज्या प्लास्टिक कोटेड आहेत, किंवा त्या प्लास्टिक लॅमिनेटेड आहेत. अशा वस्तूंवर बंदी घालण्यात यावी अशी शिफारस केली होती. राज्य सरकारने या समितीची ही शिफारस स्विकारली असून, राज्यात अशा प्रकारच्या प्लास्टिक वापरावर बंदी घालण्यात आली आहे. याबाबत मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली. आता या वस्तूंवर बंदी घालण्यात आली आहे. जेणे करून पर्यावरणाला घातक असलेले प्लॉस्टिक ज्यांचा समावेश अविघटनशील पदार्थांमध्ये समावेश आहे. त्यामुळे पर्यावरणाला तसेच प्राण्यांना धोका असतो आरोग्यासाठी हानिकारक असते. म्हणून त्याच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे.