Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पंकजा मुंडे यांच्यासह 40 ते 50 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

पंकजा मुंडे यांच्यासह 40 ते 50 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
, मंगळवार, 27 ऑक्टोबर 2020 (08:02 IST)
भगवान भक्ती गडावर दसरा मेळावा घेतल्याने भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यासह 40 ते 50 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आपत्ती व्यवस्थापन कायद्याचं उल्लंघन केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. 
 
मोजक्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा मेळावा ऑनलाईन घेण्याचं योजण्यात आलं होतं, मात्र तरीही पंकजा मुंडेंच्या अनेक सर्मथकांनी यावेळी गर्दी केली. पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडावर जाऊन नमस्कार केला. त्यानंतर भगवान गडावर पूजा-अर्चना केली आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं.ऑनलाईन दसरा मेळावा घेतल्याने पंकजा मुंडेंसह 40 ते 50 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये रासप नेते महादेव जानकर, रमेश कराड यांचाही समावेश आहे. अमळनेर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आपत्ती व्यवस्थापन कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पुण्यात १ नोव्हेंबरपासून उद्याने खुलणार