Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राज्यसभेच्या निवडणुकीबाबत भाजपच्या कोअर कमिटीत चर्चा करून निर्णय : फडणवीस

राज्यसभेच्या निवडणुकीबाबत भाजपच्या कोअर कमिटीत चर्चा करून निर्णय : फडणवीस
, शुक्रवार, 24 सप्टेंबर 2021 (08:59 IST)
काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या निधनानंतर राज्यसभेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे.ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न सुरु आहेत. काँग्रेसच्या याच भूमिकेवर बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र पडणवीस यांनी महत्त्वाचे भाष्य केले आहे. निवडणूक बिनविरोध व्हावी का ? याबाबत भाजपच्या कोअर कमिटीमध्ये चर्चा करु. त्यानंतर काँग्रेसला कळवण्यात येईल,अशी माहिती फडणवीस यांनी दिली आहे.
 
राज्यसभेची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीनंतर भाजप काय भूमिका घेणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली होती. त्यानंतर आता भाजपची भूमिका काय असेल याबाबत फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. आज बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले मला भेटले. त्यांनी राज्यसभेची निवडणूक बिनविरोध व्हावी अशी विनंती केली आहे. या संदर्भात भाजपच्या कोअर कमिटीमध्ये आम्ही चर्चा करू. त्यानंतर त्यांना कळवू असं सांगितलं आहे, अशी माहिती फडणवीस यांनी दिलीय.
 
काँग्रेसने निवडणूक बिनविरोध करावीअशी विनंती केल्यानंतर १२ आमदारांच्या निलंबनाची कारवाई रद्द करण्यात यावी अशी मागणी फडणवीस यांनी केली होती, असे सांगण्यात येत होते. या चर्चेवरदेखील फडणवीस यांनी सविस्तर भाष्य केले आहे. बारा आमदारांचे निलंबन मागे घ्यावं असा विषय याठिकाणी नाही.भाजप अशा पद्धतीने सौदेबाजी करत नाही. या उडवलेल्या पतंगी आहेत.बारा आमदार जे निलंबित झाले आहेत,ते नियमबाह्य आहे.त्या संदर्भात आम्ही न्यायालयीन लढाई लढत आहोत.आम्ही सौदेबाजी करणारे नाही, तर संघर्ष करणारे लोक आहोत, असं फडणवीस यांनी म्हटलंय.
दरम्यान, निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी काँग्रेसने भाजपला विनंती केल्यामुळे अनेक चर्चा रंगल्या आहेत. काँग्रेसला महाविकास आघाडीतील शिवसेना तसेच राष्ट्रवादी काँग्रेसवर विश्वास नाही का ?असा प्रश्न विचारला जात आहे. तर या सर्व चर्चांच्या पलीकडे जाऊन काँग्रेसच्या विनंतीनंतर भाजप काय निर्णय घेणार याची सर्वांना उत्सुकता लगली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राज्यात 3,320 नवे कोरोना रुग्ण,4,050 जणांना डिस्चार्ज