पुणे : एका खासदाराला निवडून आणण्यासाठी मी आणि वळसे पाटलांनी प्रयत्न केला, नाव न घेता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांच्यावर टीका केली आहे. तर त्यांच्याविरोधात दिलेला उमेदवार निवडून आणणारच असं म्हणत अजित पवारांनी थेट दंडही थोपटले आहेत. तसेच, शिरुर लोकसभा मतदारसंघाचेखासदार अमोल कोल्हेंवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाव न घेता टीका केली आहे. एका खासदाराला निवडून आणण्यासाठी मी आणि दिलीप वळसे पाटलांनी जीवाचे रान केले. तसेच आता आम्ही त्यांच्याविरोधात उमेदवार दिला तर आम्ही तो उमेदवार निवडून आणणारच, असंही अजित पवार म्हणाले आहेत.
ज्यांना माझ्यासोबत यायचे आहे, त्यांनी माझ्यासोबतच यावे, ज्यांना दुस-या बाजुला जायचे आहे, त्यांनी तिकडे जावे, माझ्या बाजूनं म्हणजे काय हुकुमशाही आहे का? ज्यांनी माझी बाजू घेतली, त्यांनी दुटप्पी भूमिका घेऊ नका, मेहरबानी करा, खरे जे बोलतो तेच सांगा., असे अजित पवार म्हणाले. अनेक कार्यकर्ते अजुनही दोन्ही बाजूंनी दिसतात, असे विचारताच अजित पवार म्हणाले की, असू द्यात ना, मी सांगायचे काम केले आहे, बघु काय फरक दिसतोय का? माझ्या दृष्टीने जे योग्य वाटते, ती भूमिका घेण्याची मला मुभा आहे, मला इतरांनी टोकण्याचे कारण नाही.
एका खासदाराने जर आपल्या मतदारसंघात लक्ष दिले असते, तर खूप बरे झाले असते. एक खासदार एक ते दीड वर्षापूर्वी मला राजीनामा द्यायचा आहे. त्या खासदाराला उमेदवारी मी दिली आहे. त्या खासदाराला निवडणून आणण्यासाठी जीवाचे रान मी आणि दिलीप वळसे पाटलांनी केले आहे.
Edited By-Ratnadeep Ranshoor