Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

संजय दत्तच्या डायलॉगचा केला दहशत माजवायला केला टिक टॉक पोलिसांनी केले त्यांना ठीक ठाक

संजय दत्तच्या डायलॉगचा केला दहशत माजवायला केला टिक टॉक पोलिसांनी केले त्यांना ठीक ठाक
, गुरूवार, 16 मे 2019 (09:31 IST)
पिंपरी येथे काही गुंड प्रवृत्तीच्या मुलांनी दहशत निर्माण करायला अभिनेता संजय दत्तच्या चित्रपटातील एका डायलॉगवर हातात कोयते घेऊन टिक टॉक  व्हिडीओ तयार केला. मात्र हा व्हिडियो यातील चार युवकांना चांगलच महागात पडला आहे. ‘अरे पकडनेकी बात छोड अपुन को टच भी नहीं कर सकता’ असे म्हणत ४ टिक टॉक वीरांवर सांगवी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, त्यातील दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकत ठीक ठाक केले आहे. त्यामुळे परिसरात यांची जोरदार चर्चा आहे. या व्हिडियो प्रकरणी पोलिसांनी अभिजीत संभाजी सातकर (वय २२), शंकर संजय बिराजदार (वय १९, पिंळे निलख) यांना ताब्यात घेतले आहे. या प्रकऱणी त्यांच्या एका अल्पवयीन साथीदारासह जीवन रानावडे या तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. संजय दत्तच्या एका चित्रपटातील प्रसिद्ध डायलॉग आहे. अरे पकडनेकी बात छोड अपुन को टच भी नहीं कर सकता डायलॉगवर पिंपळे निलख येथील तरुणांनी हातात कोयते घेऊन टिक- टॉक अॅपवर व्हिडिओ तयार करत तो व्हायरल केला. मात्र हा व्हिडीओ पसरत तो पोलीस कर्मचारी पिसे यांच्या निदर्शनास आला. त्यानंतर त्यांनी व पोलीस उपनिरीक्षक साळुंखे यांनी कर्मचाऱ्यांसह तपासाला सुरुवात केली. अखेर पोलिसांनी या व्हिडिओतील चौघांपैकी दोघांचा शोध घेतला. परंतु त्यांचा अल्पवयीन साथीदार आणि आणखी एक तरुण यांचा शोध पोलीस घेत आहेत. या सर्वांवर आर्म्स अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर शिंदे,गुन्हे पोलीस निरीक्षक रवींद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे हौस आणि इतर कोणतेही कारण असेल तर असे शस्त्र, हत्यारे घेवून व्हिडियो करू नकाच नाही तर कायदा तुम्हाला सोडणार नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

एअरटेलच्या 'या' ग्राहकांना मोफत लाइफ इन्शुरन्स