मुंबई-आग्रा महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात आठ गाड्या एकमेकांवर आदळ्या. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. या विचित्र अपघातात एका कारचा पूर्णपणे चक्काचूर झाल्याची बातमी आहे.
धुळे जिल्ह्यातील बिजासनी घाट ते पळासने याच्या दरम्यान हा अपघात झाला असून यात गाड्या एकमेकांवर आदळळ्याने जखमींना गाडीतून बाहेर काढण्यात अडचणींना सामोरा जावं लागलं.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ओव्हरटेक करत असताना हा अपघात झाला असल्याचं सांगितलं जात आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अपघातातील जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.