राज्यात आयात करणाऱ्या दारूवर उत्पादन शुल्क तब्बल 50 टक्क्यांनी कपात करण्यात आलं आहे. या निर्णयामुळे इतर राज्यात असलेल्या दारूच्या किंमती राज्यातली किंमती एक समान असणार आहे.
राज्यात अनेक प्रकारचे मद्य हे आयात होत असतं. स्कॉच प्रकारच्या दारूतून राज्याला मोठा महसूल मिळतो.
राज्य सरकारला स्कॉचच्या विक्रीतून वर्षाला 100 कोटींचा महसूल मिळत असतो. या कपातीतून आता राज्याच्या महसुलामध्ये वाढ होणार आहे. राज्याचा महसूल आता 250 कोटी रुपये वार्षिक होण्याची अपेक्षा आहे.