Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कर्जाची नोटीस हातात पडताच शेतकऱ्यांची आत्महत्या

कर्जाची नोटीस हातात पडताच शेतकऱ्यांची आत्महत्या
, गुरूवार, 14 ऑक्टोबर 2021 (15:31 IST)
राहुरी तालुक्यातील केसापूर येथिल शेतकऱ्यांने सहकारी संस्थेची कर्जाची नोटीस आल्यानंतर  राञी शेतातील आंब्याच्या झाडाला दोरीच्या साह्याने गळफास घेवून आत्महत्या केली.
 
सकाळी आत्महत्या केल्याचे उघड झाले. याबाबत समजलेली माहिती अशी की, केसापूर ता.राहुरी येथिल शेतकरी महादु सहादु कोतवाल (वय 82 ) यांनी दोन दिवसापुर्वी केसापूर सोसायटीचे थकीत कर्ज भरण्या संदर्भात पोष्टाने नोटीस मिळाली होती.दोन दिवस कर्ज कसे फेडायचे याच विवंचेत होते. मंगळवारी राञी उशिरा हा शेतकरी घरा बाहेर पडला. बाहेर पडण्यापूर्वी सोसायटीच्या कर्जाच्या नोटीसाच्या पाठीमागिल बाजुस मी आत्महत्या करत आहे.
माझ्या आत्महत्येला घरातील कोणालाही जबाबदार धरु नये मला सोसायटीचे कर्ज कसे फेडायचे हा प्रश्न असल्याने कर्जापायी मी जीवनयाञा संपवत आहे.
अशी चिठ्ठी लिहुन राञी आत्महत्या केली आहे. बुधवारी सकाळी आत्महत्या केल्याचे उघड झाले. साई प्रतिष्ठानच्या रुग्णवाहीनीचे चालक रवि देवगिरे व देवळाली प्रवरा पोलीस चौकीचे पोलीस .यांनी मृतदेह खाली उतरुन राहुरी ग्रामिण रुग्णालयात दाखल केला परंतू वैद्यकिय सुञाने मृत घोषित केले. शवविच्छेदन करुन आकस्मत मृत्यू नोंद करण्यात आली आहे.पुढील तपास पो.ना.जानकीराम खेमनर हे करीत आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ऐन सणोत्सवात अहमदनगरमध्ये वीजपुरवठ्यात 2 तासांची कपात सुरु