Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आमदार संजयमामा शिंदेंविरोधात शेतकरी आक्रमक, पुण्यातील पंजाब बँकेवर अर्धनग्न आंदोलन करत मागितली भीक!

आमदार संजयमामा शिंदेंविरोधात शेतकरी आक्रमक, पुण्यातील पंजाब बँकेवर अर्धनग्न आंदोलन करत मागितली भीक!
पुणे , गुरूवार, 17 जून 2021 (16:21 IST)
करमाळ्यातील शेतकऱ्यांनी आज पंजाब नॅशनल बँकेवर अर्धनग्न होक भीक मांगो आंदोलन केलं. संजयमामा शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या नावे बोगस कर्ज उचलल्याचा प्रकार समोर आलाय. त्याचबरोबर उचललेलं कर्ज वेळेत न भरल्यामुळे बँकेनं शेतकऱ्यांनाच नोटीस बजावल्या. या प्रकरणात न्याय न मिळाल्यानं करमाळ्यातील शेतकऱ्यांनी पुण्यातील पंजाब नॅशनल बँकेच्या कॅम्पमधील विभागीय कार्यालयासमोर आंदोलन केलं. 
 
न्यायासाठी शेतकऱ्यांने अनेक दरवाजे ठोठावले. मात्र कुठूनही न्याया मिळत नसल्यानं शेतकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. यावेळी आंदोलक शेतकऱ्यांना बॅक मॅनेजर यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलनादरम्यान मागितलेल्या भीकेच्या स्वरुपातील पैसे बँक आणि आमदार संजयमामा शिंदे यांना पाठवले. 2013 पासून आतापर्यंत कारखाना आणि बँकेची कोणतीही नोटीस शेतकऱ्यांना आली नाही. मात्र, 29 मे नंतर पंजाब नॅशनल बँकेच्या वकिलांकडून पोस्टाने नोटीस पाठवून कर्जाची रक्कम 2 मे पर्यंत भरावी, अन्यथा फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्या नोटिशीत देण्यात आलाय.
 
2013 साली खतं देतो म्हणून शेतकऱ्यांची कागदपत्रे घेतली
संजयमामा शिंदे यांनी आपल्या विठ्ठल कॉर्पोरेशन, म्हैसगाव, ता. माढा या साखर कारखान्याद्वारे शेतकऱ्यांना 2013 साली खत देतोना म्हणे कागदपत्रे गोला केली. संबंधित शेतकऱ्यांना खत न देता त्यांच्या कागदपत्रांचा गैरवापर करुन पुण्यातील कोथरुड परिसरात असलेल्या पंजाब नॅशनल बँकेकडून शेतकऱ्यांच्या नावे 22 कोटी 11 लाख रुपयांचे कर्ज उचलल्याचं समोर आलंय.   याप्रकरणी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि आमदार संजय शिंदे यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करून त्यांच्या संपत्तीची चौकशी करण्याच्या मागणी या आंदोलनाद्वारे करण्यात आलीय.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भाजपाकडून बाळासाहेबांचाच एक व्हिडीओ शेअर करून शिवसेनेला प्रत्युत्तर