Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अमळनेर तालुक्याचे माजी आमदार गुलाबराव पाटील यांचे 90 व्या वर्षी निधन

shradhanjali
, बुधवार, 23 ऑगस्ट 2023 (10:47 IST)
Gulabrao Patil passed away :अमळनेर तालुक्याचे माजी आमदार गुलाबराव वामनराव पाटील यांचे वयाच्या 90 व्या वर्षी मंगळवारी सायंकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यावर बुधवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. 

गुलाबराव पाटील हे तीन वेळा एकूण 13 वर्षे जनता दलाचे आमदार होते. ते समाजवादी विचारसरणीचे होते. त्यांची ओळख फर्डे वक्ते म्हणून होती. ते दीर्घकाळी जनता दलात राहिले नंतर त्यांनी राजकीय जीवनाच्या अखेरच्या टप्प्यात त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 

मुलुख मैदान तोफ म्हणून माजी आमदारांची ओळख होती. त्यांचा राज्यात दरारा होता. साची संदेश वृत्तपत्राचे पत्रकार म्हणून त्यांनी काम केले आहे. अहिराणीत शपथ घेणारे ते एकमेव होते. 
 
गुलाबराव वामराव पाटील यांनी 1978 साली पहिल्यांदा विधानसभा निवडणूक जिंकली, त्यांनी इंदिरा काँग्रेसच्या दाभाडे रामदास सुग्राम यांचा पराभव केला होता. यानंतर त्यांनी 1980 साली जेपींच्या जनता पार्टीकडून निवडणूक लढवली, त्यांनी इंदिरा काँग्रेसच्या संभाजी गोविंदराव चव्हाण यांचा पराभव केला, यानंतर त्यांचा अमृतराव पाटील यांच्याकडून पराभव झाला. मात्र गुलाबराव पाटील पुन्हा 1990 साली, काँग्रेसचे दाजिबा पर्बत पाटील यांचा पराभव करुन पुन्हा आमदार झाले.ते आधी लोकल बोर्डावर, यानंतर जिल्हा परिषदेवर निवडून आले होते.
त्यांनी शेतकऱ्यांसाठी शिंगाडे मोर्चा काढला. त्यांची अंत्ययात्रा 23 ऑगस्ट रोजी दहीवद ,अमळनेर येथून दुपारी 2 वाजता निघणार आहे. 
 
 
Edited by - Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Chandrayaan3 Landing: चांद्रयान3 आज रचणार इतिहास, चंद्रावर चांद्रयानचे सॉफ्ट लँडिंग कसे होईल जाणून घ्या