Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कॉ. गोविंद पानसरे हत्या : हत्येमागे दोघे नाहीत, तर चौघेजण

कॉ. गोविंद पानसरे हत्या : हत्येमागे दोघे नाहीत, तर चौघेजण
, शुक्रवार, 16 जून 2017 (16:26 IST)

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येमागे दोघे नाहीत, तर चौघेजण असल्याचा दावा पोलिसांनी पुरवणी आरोपपत्रामध्ये केला आहे. कॉ. पानसरेंच्या हत्येमध्ये वापरलेल्या 2 पिस्तुलांपैकी एक पिस्तुल डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येत, तर दुसरी पिस्तुल कलबुर्गींच्या हत्येत वापरल्याचा दावाही या आरोपपत्रामधून पोलिसांनी केला आहे. समीर गायकवाड हा कॉ. गोविंद पानसरेंच्या हत्येच्या कटात प्रत्यक्ष सहभागी असल्याचा ठपकाही आरोपपत्रात ठेवण्यात आला आहे. समीर गायकवाडच्या जामीन अर्जावरच्या सुनावणीवेळी या बाबी उघड झाल्या आहेत. प्रत्यक्षदर्शींनी समीर गायकवाडला ओळखले आहे. त्यामुळे त्याला जमीन देऊ नये, असा युक्तीवाद विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर यांनी केला. 


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ट्विटर अजून झाले देखणे