Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हृदयद्रावक! विजेचा धक्का लागून दोन भावांचा दुर्देवी अंत

current shock
, मंगळवार, 28 मे 2024 (19:32 IST)
कराड तालुक्यात गोवारे येथे विहिरीजवळ असलेल्या फ्युजबॉक्सने विजेचा धक्का लागून दोन सख्ख्या भावांचा दुर्देवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.तुकाराम सदाशिव खोचरे(55) आणि शहाजी सदाशिव खोचरे(50) अशी मयतांची नावे आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, तुकाराम आणि शहाजी या भावांचे गावातील भटकी नावाच्या शिवारात शेत असून या ठिकाणी विहीर देखील आहे. या विहिरीच्या जवळ असलेला फ्युजबॉक्स मधून वीज पुरवठा होत असून शुक्रवारी दुपारच्या वेळेला ते विहिरीतून शेतात पाणी देण्यासाठी गेले असता ते घरी परतले नाही. 
 
त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या मोबाईलवर त्यांच्याशी संपर्क साधला असून दोघांचा फोन लागत होता मात्र त्यांच्याशी काहीच संभाषण झाले नाही तर संध्याकाळी तुकाराम खोचरे यांचा मुलगा त्यांना शोधायला गेला असता त्यांना ते दोघे फ्युजबॉक्स जवळ निपचित पडलेले दिसले. मुलांनी ही माहिती कुटुंबियांना दिली. नंतर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली असून कराड शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले नंतर पोलिसांनी पंचनामा करत मृतदेह पाण्यात घेऊन पुढील तपासणीसाठी पाठविले. या घटनेमुळे कुटुंबात शोककळा पसरली आहे. 

Edited by - Priya Dixit

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

गौतम गंभीर भारतीय संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक होणार का?