Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Sunday, 20 April 2025
webdunia

विधानपरिषद निवडणूक : युतीच्या आमदारांना ताज मध्ये स्नेहभोज

htel taj
, बुधवार, 6 डिसेंबर 2017 (17:12 IST)

पारदर्शकता आणि साधी विचारसरणी राहणी असे भाजपा नेहमी सांगते तर देशाचे  पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेहमी साधी राहणी ठेवा असे सागंत असतात. मात्र हे तरी कोणी पाळताना दिसत नाही,  भाजप नेते अलिशान पंचतारांकित हॉटेलमध्ये लवकरच स्नेहभोजन करणार आहेत. विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार असलेले प्रसाद लाड यांनी युतीच्या आमदारांसाठी मुंबईतील पंचतारांकित ‘ताज’ हॉटेलमध्ये स्नेहभोजन आयोजन केले आहे. विधानपरिषदेच्या एक जागा नारायण राणे यांनी यांनी राजीनामा दिल्यानंतर  रिक्त झाली होती. पोटनिवडणुकीत भाजपचे अधिकृत उमेदवार असलेल्या प्रसाद लाड यांनी युतीच्या आमदारांसाठी ‘ताज’ हॉटेलमध्ये स्नेहभाजन आयोजित केले आहे. मते फुटू नये म्हणून लाड हे सर्व प्रकारचे काम करत आहेत. त्यामुळे साधी पणाची शिकवण कोठे गेली अशी चर्चा रंगू लागली आहे.


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आता मराठी भाषेचा वापर अनिवार्य