Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मात्र मुख्यमंत्री कोण ते शिवसेनेने ठरवावं - आदित्य ठाकरे

मात्र मुख्यमंत्री कोण ते शिवसेनेने ठरवावं - आदित्य ठाकरे
, शनिवार, 20 जुलै 2019 (10:16 IST)
भाजपा नेते अमित शाह व शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे सर्व ठरले आहे. त्यावर त्यामुळे मी भाष्य करणे योग्य ठरणार नाही, मात्र  मुख्यमंत्री कोण ते शिवसेनेने ठरवावं, असे सूचक वक्तव्य युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांच्या नियोजित जनआशीर्वाद यात्रेचा दुसरा दिवस आहे. ते धुळे आणि मालेगाव भागातील नागरिकांशी भेटून त्यांच्याशी संवाद साधला आहे. 
 
ठाकरे पुढे म्हणाले की, ही जनआशीर्वाद यात्रा असून, मतं मागण्यासाठी किंवा प्रचारासाठी नाही. विधानसभेत प्रचारासाठी मी पुन्हा येणार आहे, तेव्हा आपण निवडणुका जिंकणारच आहोत. गेली पाच वर्षे पूर्ण महाराष्ट्रात फिरत असताना आंदोलने केली. रस्त्यावरती उतरलो. सरकारच्या माध्यमातून प्रश्न सोडवले. खासदारांसाठी निवडणुकांमध्ये जे प्रेम मतदारांनी शिवसेनेवर दाखवले आहे म्हणून त्यांचे आभार मानण्यासाठी मी जनआशीर्वाद यात्रेचे आयोजन केले असून, शिवसेना कळलेली नाही त्यांनी शिवसेनेच्या विरोधात मतदान केले, त्यांची मनं जिंकण्यासाठी ही जनयात्रा काढली आहे.
 
2012 पासून मी दुष्काळ दौरा करत आहे, पण मागच्या वर्षीचा दुष्काळ हा जरा वेगळा होता. दुष्काळी दौरा करत असताना फोटो काढणे महत्त्वाचे नसते, तर लोकांच्या अडचणी समजून त्या दूर करणे हे महत्त्वाचे असते. शेतकऱ्यांसाठी जे जे करता येईल, ते ते करत आलेलो आहे आणि यापुढेही करतच राहणार आहोत, हे वचन देण्यासाठी मी इथे आलेलो आहे. तुमच्या मनात काय आहे, तुमच्या समस्या काय आहेत, हे जाणून घेण्यासाठी या यात्रेचे आयोजन केले आहे, असेही ठाकरे म्हणाले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

खून प्रकरणी पुणे येथील माजी नगरसेवकाच्या दोन मुलांना जन्मठेप