नगर - महिलांसाठी असलेल्या कायद्याचा आधार घेत पतीसह त्याच्या कुटूंबास त्रास देणाऱ्या पत्नीविरोधात पतीने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात तक्रारीची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सावेडीतील गुलमोहोर रोड परिसरातील कॉलनीत राहणाऱ्या एका कुटूंबातील तरुणाचे लग्न नेवासा तालुक्यातील एका मुलीशी झाले. लग्नानंतर काही दिवस व्यवस्थित गेल्यानंतर पती-पत्नीचे वाद झाले. गेल्या सहा वर्षापासून पत्नी पतीला सोडून विभक्त राहत आहे.
सदर पत्नीने महिला संरक्षण कायद्याचा दुरुपयोग करून पती व त्याच्या कुटूंबाची समाजात बदनामी करत असल्याचे पतीचे म्हणणे आहे. त्यामुळे होणाऱ्या मानसिक त्रासातून अख्खे कुटूंब अस्वस्थ झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
सदर पत्नीने पती व त्याच्या कुटूंबियांनी जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे. तसेच पत्नीने पतीसह त्याच्या कुटूंबाविरोधात पोलिसांकडे अनेक तक्रार अर्ज करत त्रास देत असून, पत्नी सावेडीतील घरी येवून त्यांना धमकी देत असल्याचेही म्हटले आहे.