राष्ट्रवादी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सुद्धा शिंदे सरकारवर टीका केली आहे. शिवसेनेच्या जाहिरातीवर बोलण्यानंतर अजित पवार महणाले की, एवढे लोकप्रिय आहात तर निवडणुका का टाळता? यावेळी त्यांनी फडणवीसांपेक्षा शिंदे लोकप्रिय हे भाजपाला मान्य आहे का? असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.
अजित पवार म्हणाले की, एकनाथ शिंदे किंवा जाहिरात देणार इतक्या लवकर कसे काय बाळासाहेबांना विसरले मला काय कळले नाही. कारण मुळातच आम्ही बाळासाहेबांच्या विचारांचे, आनंद दिघेंच्या विचारांचे सांगून त्यांनी तो पक्ष स्वत:कडे खेचून घेतला. परंतु तिथे आनंद दिघेंचा आणि हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा फोटोही कुठे दिसला नाही. अशाप्रकारच्या जाहिराती मी पाहिल्या पण स्वत:च ठरवून सर्वेक्षण केलं. कुणी सर्वेक्षण केले, कुणी सांगितलं की कोणाला किती टक्के. आता तुम्ही बघितलं तर एक्झिट पोल येतात तेव्हा सर्वे कुणी केला हे सांगता. मध्य सकाळने एक सर्वे केलेला माझ्या वाचनात आला, तेव्हा सकाळने सांगितलं आम्ही करून घेतला. तसा हा सर्वे कोणी करून घेतला आहे.
ते म्हणाले की, एकनाथ शिंदे इतक्या लवकर बाळासाहेबांना विसरले कसे. लोकांचा पाठिंबा असेल तर तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका का घेत नाहीत. पुढील 15 दिवसात एक वर्षे पूर्ण होईल. प्रत्येक जण विचारत आहे निवडणुका कधी लागणार. यावेळी त्यांनी फडणवीस यांपेक्षा शिंदे लोकप्रिय हे भाजपाला मान्य आहे का? असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.
Edited By- Ratnadeep Ranshoor