Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सांगलीत जमिनीच्या वादातून त्रस्त शेतकऱ्याचे टेलिफोनच्या खांबावर चढून आंदोलन !

सांगलीत जमिनीच्या वादातून त्रस्त शेतकऱ्याचे टेलिफोनच्या खांबावर चढून आंदोलन !
, शनिवार, 30 जुलै 2022 (14:21 IST)
असं म्हणतात की पैसे जमीन या मुळे नाते देखील दुरावतात. शेतीवरुन भावकीचा वाद हा काही नवीन नाही. पण सातत्याने होणाऱ्या त्रासाला कंटाळून जत तालुक्यातील वाळेखिंडी येथील एका शेतकऱ्याने वेगळीच भूमिका घेत न्यायाची मागणी करीत थेट दूरध्वनीच्या खांबावर चढून आंदोलन केल्याचा प्रकार घडला आहे. वाळेखिंडी येथे बापूसाहेब शिंदे यांनी टोकाचे पाऊल घेत अनेक दिवसांपासून  जमिनीच्या वादातून निघत नसल्याने त्यांनी खांब्यावर चढून शोले स्टाईलमध्ये आंदोलन केले. आता यावर प्रशासन काय तोडगे काढणार हे पाहणे महत्त्वाचे आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, बापुशिंदे यांच्या जत तालुक्यातील शेत विहिरीवर त्यांच्या भावकी बांधवांनी बेकायदेशीर वीज कनेक्शन घेतले होते. ही बाब उघडकीस आल्यावर वीज कंपनीनं त्यांच्यावर कारवाई केली. नंतर बापू शिंदे यांनी आपल्या चुलत भावांना कायदेशीर वीज कनेक्शन घेण्यास सांगितले.मात्र त्यांचे म्हणणे एकूण न घेता त्यांना मारहाण करण्यात आली. बापूसाहेबांनी गावातील पंचांकडून न्यायाची मागणी केली आणि जत तहसीलदारांचे दार ठोठावले. त्या ठिकाणी त्यांचे भाऊ आले नाही. त्यामुळे न्याय मिळवण्यासाठी संतप्त होऊन त्यांनी टेलिफोनच्या खांब्यावर चढून न्याय मागण्याची सुरुवात केली. त्यांना खांब्यावर चढलेलं बघून लोकांनी तिथे मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्यांना नगरपालिकेचे नगरसेवकांनी समजूत काढून त्यांना खाली उतरवले. त्यांच्या या आंदोलनाने प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली होती. 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी कोल्हापुरी जोडा दाखवण्याची गरज आहे – उद्धव ठाकरे