Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हवेच्या यादीत ‘लातूर’ देशात पाचव्या क्रमांकावर

latur mahapalika
, बुधवार, 6 डिसेंबर 2023 (20:17 IST)
गेले काही दिवस वायूप्रदूषण जगभरातच मोठ्या प्रमाणावर वाढते आहे. प्रदूषणामुळे अनेक देशांच्या चिंता वाढत आहे. प्रदूषणाबाबत पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या नॅशनल क्लीन एअर प्रोग्रामने नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालांमधून लातूरकरांसाठी एक दिलासादायक बाब समोर आली आहे. नॅशनल क्लीन एअर प्रोग्रामने देशाची राजधानी दिल्लीसह १३१ शहरांचे तुलनात्मक निरीक्षण केले. या अहवालानुसार, स्वच्छ हवेच्या बाबतीत ‘लातूर’ देशात पाचव्या क्रमांकावर आहे.
 
पर्यावरण आणि मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातील पाचव्या क्रमांकाची सर्वोत्तम हवा महाराष्ट्रातील लातूरची होती. केंद्रीय मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, येथील हवेतील पीएम१० चे प्रमाण वर्षभर सरासरी ५३ मायक्रोग्रॅम घनमीटरपेक्षा जास्त नव्हते. तर आसाममधील शिवसागर येथील हवा देशातील सर्वोत्तम हवा म्हणजेच सर्वात स्वच्छ हवा होती. विषारी कण असलेले पीएम १० चे प्रमाण येथील हवेत फक्त ४२ असल्याचे आढळून आले.
 
हिमाचल प्रदेशातील सुंदर नगरची हवा देशात सर्वात स्वच्छ (४६) दुसऱ्या क्रमांकावर आहे. संपूर्ण देशात तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या हिमाचल प्रदेशातील परवानू आणि तमिळनाडूमधील त्रिची येथे वर्षभर हवेची गुणवत्ता चांगली होती. येथे पीएम१० ची सरासरी एकाग्रता ४७ मायक्रोग्रॅम क्यूबिक मीटर नोंदवली गेली. तर संपूर्ण देशात, चौथ्या क्रमांकावर असलेल्या आसाममधील आणखी एका शहर सिलचरच्या हवेत पीएम१० चे प्रमाण ४९ असल्याचे आढळून आले.

Edited by -Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मेट्रो बनली कुस्तीचा आखाडा, धावत्या मेट्रोत दोघांमध्ये जोरदार हाणामारी