Publish Date: Wed, 06 Dec 2023 (18:58 IST)
Updated Date: Wed, 06 Dec 2023 (19:02 IST)
महाराष्ट्र राज्याची कायदा सुव्यवस्था अधिक प्रगत आणि बलाढ्य करण्याची गरज असल्याचे दावे एनसीआरबी (NCRB Report)च्या ताज्या अहवालातून उघड झाले आहे. या अहवालानुसार राज्यात हिंसाचार आणि दंगलीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून देशात सर्वाधिक दंगलीच्या घटना महाराष्ट्रात घडल्या आहे.
एनसीआरबीच्या अहवालात सर्वाधिक दंगली आणि हिंसाचार घडणाऱ्या राज्याच्या यादीत महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर आहे.
आता मुंबईतून धक्कादायक माहिती मिळाली असून गेल्या 48 तासात नवी मुंबई येथून 6 अल्पवयीन मुलं बेपत्ता झाले असल्याचे समोर आले आहे. पालकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
सध्या मुंबईत अल्पवयीन मुलांचे अपहरण करून त्यांना विकले जात असल्याची माहिती समोर आली आहे.
गेल्या 48 तासांत नवी मुंबईतून कोपरखैरणे, कामोठे, पनवेल, कळंबोली, आणि रबाळे या परिसरातून 12 ते 15 वयोगटाची 6 अल्पवयीन मुलं बेपत्ता झाल्यामुळे पोलीस प्रशासन च्या यंत्रणेवर मोठा प्रश्न उद्भवत आहे. अद्याप या मुलांचा शोध लागला नाही. बेपत्ता झालेल्या मुलांच्या पालकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून मुलांचा शोध तातडीनं लावण्याची मागणी केली आहे. पोलीस या घटनेमुळे सतर्क झाले असून मुलांचा शोध घेण्यासाठी टास्कफोर्सची स्थापना केली असून मुलांचा शोध लावण्याचे कार्य सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.