Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बेळगाव येथील तिरंगा पुन्हा फडकला,आमदार राजू सेठ यांचे प्रयत्न

biggest flag in India
, गुरूवार, 18 मे 2023 (07:48 IST)
बेळगाव : किल्ला येथील देशातील सर्वात उंच असलेला तिरंगा ध्वज मागील काही दिवसांपासून फडकविण्यात आला नव्हता. अखेर मंगळवारी बेळगाव उत्तरचे आमदार राजू सेठ यांच्या प्रयत्नांतून तिरंगा ध्वज फडकविण्यात आला. तिरंगा ध्वज हा आपल्या देशाची शान आहे. त्यामुळे बेळगावमधील ध्वज कायम फडकत राहील, याची काळजी आम्ही यापुढे घेऊ, असे आश्वासन त्यांनी दिले. 
 
मध्यंतरीच्या काळात बुडाकडून तिरंगा ध्वजाचे व्यवस्थापन करण्यात येत नव्हते. खर्च जास्त असल्याचे कारण देत हा ध्वज फडकविण्यात आला नव्हता. माजी आमदार फिरोज सेठ यांनी मोठ्या प्रयत्नांनी त्यांच्या कार्यकाळात देशातील सर्वात उंच ध्वज बेळगावमध्ये फडकविला होता. दरम्यान तांत्रिक कारणे सांगत हा ध्वज फडकविण्यास असमर्थतता दर्शविण्यात येत होती. 
 
नवनिर्वाचित आमदार राजू सेठ यांनी मंगळवारी बुडा तसेच महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना एकत्रित बोलवत सर्वात उंच तिरंगा ध्वज फडकविला. हा ध्वज बेळगावच्या सौंदर्यात भर घालत असून यापुढे तो कायम फडकत राहील. तांत्रिक अथवा वादळ सदृष्य परिस्थिती असेल तरच हा ध्वज फडकविला जाणार नाही. या व्यतिरिक्त दररोज ध्वज फडकेल, याची खबरदारी आम्ही घेऊ, असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी माजी आमदार फिरोज सेठ उपस्थित होते.
 
Edited by: Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

PBKS vs DC : दिल्लीने पंजाबचा प्लेऑफ खराब केला, 15 धावांनी विजय मिळवला