Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कोल्हापूर: सरकारचा महत्वपूर्ण निर्णय पंचगंगासह 11 नद्यांमधील गाळ निघणार

mithi river
, शुक्रवार, 28 जुलै 2023 (08:33 IST)
पूरपरस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्यातेल 142 नद्यांमधील गाळ काढण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामध्ये जिह्यातील पंचगंगेसह भोगावती, वारणा, वेदगंगा, कासारी, कडवी, हिरण्यकेशी, ताम्रपर्णी, घटप्रभा, कृष्णा, जांभळी अशा 11 नद्यांचा समावेश आहे. यासाठी जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली 12 जणांची समिती गठीत करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
 
राज्यात पावसाळ्यामध्ये व बारमाही वाहणाऱ्या प्रमुख नद्या व उपनद्या आहेत.दरवर्षी पावसाळ्यात या नद्यांना लहान मोठ्या प्रमाणात पूर येत असतो. या पुरामुळे आसपासच्या नागरी व शहरी भागांमध्ये पाणी घुसून दरवर्षी मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. तसेच पूरबाधितांना आर्थिक मदतही सरकारला द्यावी लागते.यामुळे दरवर्षी सरकारला दोन्ही प्रकारचे महसुली नुकसान सोसावे लागत आहे.
 
सन 2005, 2011, 2019 व 2022 या वर्षात विविध शहरांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती. त्याचबरोबर पावसाळ्यात पूराच्या पाण्याबरोबरच आजूबाजूच्या डोंगर भागातील भूस्खलनामुळे होणारी माती, दगड, गोटे, रेती आदी वाहून आल्याने नदीच्या वहन क्षमतेमध्ये घट होत आहे. तसेच पुराच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी अडथळे निर्माण होत आहेत. नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात होणारी शहरीकरण, बांधकामे, वृक्षतोड, रस्ते व रेल्वे वाहतुक आदीसाठी केलेला भराव व खोदकाम यामुळे आजूबाजूचा गाळ नदीच्या पाण्यामध्ये वाहात येत आहे. त्यामुळे नदी पात्र अऊंद व उथळ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर या नद्यांमधील गाळ काढण्याचा महत्वूपर्ण निर्णय सरकारने घेतला आहे.
 
Edited By - Ratnadeep ranshoor 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कोल्हापूर : भिंत अंगावर पडून महिलेचा मृत्यू, दोघे जखमी