पायाभूत सुविधा निर्माण करण्यात महाराष्ट्र राज्य पुन्हा एकदा अव्वल ठरले आहे. गेल्या चार वर्षांत राज्यात मुंबई- पुणे समृद्दी महामार्ग, हायब्रीड अॅन्युटी रस्ते प्रकल्प, मुंबई,नागपूर, पुणे मेट्रो प्रकल्पासारख्या एक लाख ४३ हजार ७३६ कोटी रूपये खर्चाच्या तब्बल २८४ पायाभूत सुविधा प्रकल्पाना मंजूरी मिळाली असून त्यातील बहुतांश प्रकल्पांची कामे सुरू झाली आहेत.
केंद्रीय आर्थिक व्यवहार विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार सन १९९०पासून म्हणजेच गेल्या २८ वर्षांत देशात ५४ लाख ६५ हजार कोटी किमतीचे ९०६८ पायाभूत सुविधा प्रकल्प हाती घेण्यात आले. या काळात राज्यात ६ लाख १९ हजार कोटींचे ११४४ पायाभूत सुविधा प्रकल्पाची कामे हाती घेण्यात आली आहे. तर असून उत्तरप्रदेश दुसऱ्य़ा स्थानावर असून तेथे ३ लाख ४३ हजार कोटींचे ५४४ प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. गोवा हे राज्य पायाभूत सुविधा निर्माण करण्यात तिसऱ्य़ा स्थानावर असून या राज्यात ३ लाख २५ हजार कोटी किमतीचे ४६ प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. अरुणाचल प्रदेश चौथ्या स्थानावर तर आंध्र प्रदेश क्रमवारीत पाचव्या स्थानावर आहे.