Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'तो' चक्क तीन दिवस अगोदरच येणार

'तो' चक्क तीन दिवस अगोदरच येणार
, सोमवार, 14 मे 2018 (08:31 IST)
यंदा पाऊस महाराष्ट्रात तो चक्क तीन दिवस अगोदरच म्हणजे ४ जूनला दाखल होणार आहे. उत्तर हिंदुस्थानातील धुळीच्या वादळाचा हा इफेक्ट असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
 

उत्तर हिंदुस्थानात हवेचा दाब १ हजार ते १००२ हेप्टा पास्कल एवढा आहे. त्यामुळेच तेथे वादळाचे संकेत आहेत. दक्षिणेतही उष्माघातासारखी स्थिती आहे. याचाच अर्थ यंदा पाऊस लवकरच येणार असे हवामानतज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी सांगितले. पावसाचे दरवर्षीचे वेळापत्रक तसे ठरलेले असते. म्हणजे तो २५ मे रोजी अंदमानात येतो, १ जूनला केरळात आणि ७ जूनला कोकण-गोवा मार्गे महाराष्ट्रात दाखल होतो.
यंदा उत्तर हिंदुस्थानातील धुळीचे वादळ आणि दक्षिणेत वाढलेले तापमान यामुळे पाऊस २० तारखेलाच अंदमानात आणि २४ तारखेला बंगालच्या उपसागरात दाखल होईल असा अंदाज ‘स्कायमेट’ या हवामान अभ्यासक संस्थेने म्हटले आहे. केरळमध्ये १ जूनला येणारा पाऊस २८ मे रोजीच अवतीर्ण होईल, असेही स्कायमेटचे उपाध्यक्ष महेश पलावत यांनी सांगितले.

पावसाचे वेळापत्रक
अंदमान – २० मे
केरळ – २८ मे
कोकण – ०४ जून


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दिल्ली, उत्तरप्रदेश, बंगालमध्ये वादळ, २९ ठार