Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पठाणकोट, नांदेडसह भुसावळ विभागातून धावणाऱ्या अनेक रेल्वे गाड्या रद्द ; प्रवाशांची होणार गैरसोय

पठाणकोट, नांदेडसह भुसावळ विभागातून धावणाऱ्या अनेक रेल्वे गाड्या रद्द ; प्रवाशांची होणार गैरसोय
, गुरूवार, 11 जानेवारी 2024 (08:55 IST)
भुसावळ विभागातून दिल्लीकडे जाणाऱ्या किंवा येणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी बातमी आहे. रेल्वे प्रशासनाने आग्रा विभागातील मथुरा स्टेशन येथे यार्ड रिमॉडलिंग तर पलवल-मथुरा दरम्यान नॉन इंटरलॉकिंगचे काम हाती घेण्यात येत आहे. या कामासाठी भुसावळ विभागातून धावणाऱ्या काही मेल एक्सप्रेस गाड्या 20 जानेवारी ते 6 फेब्रुवारी दरम्यान रद्द करण्यात आल्या आहेत. दरम्यान माेठ्या संख्येने गाड्या रद्द करण्यात आल्याने प्रवाशांना मोठी गैरसोयीस सामाेरे जावे लागणार अशी चर्चा सुरु झाली आहे.
 
भुसावळ विभागातून धावणाऱ्या या गाड्या रद्द
गाडी क्रमांक ११०५७ दादर-अमृतसर एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक २०.०१.२४ ते ०३.०२.२४ पर्यंत रद्द.
गाडी क्रमांक ११०५८ अमृतसर-दादर एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक २३.०१.२४ ते ०६.०२.२४ पर्यंत रद्द.
गाडी क्रमांक १२१४७ कोल्हापूर -हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक ३०.०१.२४ रोजी रद्द.
गाडी क्रमांक १२१४८ हजरत निजामुद्दीन – कोल्हापूर एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक ०१.०२.२४ रोजी रद्द.
गाडी क्रमांक १२१७१ लोकमान्य टिळक टर्मिनस -हरिद्वार सुपर एक्सप्रेस दिनांक २२.०१.२४ ते ०१.०२.२४ पर्यंत रद्द.
 
गाडी क्रमांक १२१७२ हरिद्वार-लोकमान्य टिळक टर्मिनस सुपर एक्सप्रेस दिनांक २३.०१.२४ ते ०२.०२.२४ पर्यंत रद्द.
गाडी क्रमांक १२६२९ यशवंतपूर -हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक २३.०१.२४ ते ०१.०२.२४ पर्यंत रद्द.
गाडी क्रमांक १२६३० हजरत निजामुद्दीन – यशवंतपूर एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक २६.०१.२४ ते ०७.०२.२४ पर्यंत रद्द.
गाडी क्रमांक १२७१५ नांदेड -अमृतसर सचखंड एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक २१.०१.२४ ते ०४.०२.२४ पर्यंत रद्द.
गाडी क्रमांक १२७१६ अमृतसर- नांदेड सचखंड एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक २३.०१.२४ ते ०६.०२.२४ पर्यंत रद्द.
गाडी क्रमांक १२७५१ नांदेड – जम्मूतवी हमसफर एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक २६.०१.२४ आणि ०२.०२.२४ रोजी रद्द.
गाडी क्रमांक १२७५२ जम्मूतवी-नांदेड हमसफर एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक २६.०१.२४ आणि ०४.०२.२४ रोजी रद्द
गाडी क्रमांक १२७५३ नांदेड- हजरत निजामुद्दीन संपर्कक्रांती एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक २३.०१.२४ आणि ३०.०१.२४ रोजी रद्द
 
गाडी क्रमांक १२७५४ हजरत निजामुद्दीन – नांदेड संपर्कक्रांती एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक २४.०१.२४ आणि ३१.०१.२४ रोजी रद्द.
गाडी क्रमांक १२७८१ म्हेसुर -हजरत निजामुद्दीन स्वर्ण जयंती एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक १२.०१.२४ , १९.०१.२४ आणि ०२.०२.२४ रोजी रद्द.
गाडी क्रमांक १२७८२ हजरत निजामुद्दीन- म्हेसुर स्वर्ण जयंती एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक १५.०१.२४ , २२.०१.२४ आणि ०५.०२.२४ रोजी रद्द.
गाडी क्रमांक २०६५७ हुबळी – हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक १२.०१.२४ ते ०२.०२.२४ पर्यंत रद्द.
गाडी क्रमांक २०६५८ हजरत निजामुद्दीन- हुबळी एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक १४.०१.२४ ते ०४.०२.२४ पर्यंत रद्द.
गाडी क्रमांक २२४५५ साईनगर शिर्डी -कालका एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक २७.०१.२४ ते ०६.०२.२४ पर्यंत रद्द.
गाडी क्रमांक २२४५६ कालका- साईनगर शिर्डी एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक २५.०१.२४ ते ०४.०२.२४ पर्यंत रद्द.
गाडी क्रमांक २२६८५ यशवंतपूर-चंदिगढ एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक २०.०१.२४ ते ०३.०२.२४ पर्यंत रद्द.
गाडी क्रमांक २२६८६ चंदिगढ-यशवंतपूर एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक २३.०१.२४ ते ०६.०२.२४ पर्यंत रद्द.
गाडी क्रमांक १२४०५ भुसावळ-हजरत निजामुद्दीन गोंडवाना एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक २८.०१.२४ ते ०६.०२.२४ पर्यंत रद्द.
गाडी क्रमांक १२४०६ हजरत निजामुद्दीन-भुसावळ गोंडवाना एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक २६.०१.२४ ते ०४.०२.२४ पर्यंत रद्द.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Income Tax Mumbai Bharti 2024 : 10वी/12वी उत्तीर्णांसाठी मुंबईत केंद्रीय नोकरीची मोठी संधी; ताबडतोब करा अर्ज