Publish Date: Tue, 18 Sep 2018 (12:36 IST)
Updated Date: Tue, 18 Sep 2018 (12:39 IST)
मराठवाड्याला विकासाची भूक आहे आणि मागासलेपणापासून मुक्ती हवी आहे, असे भावनिक वक्तव्य हैदराबाद मु्क्तिसंग्राम दिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
राज्य सरकारने मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी आतापर्यंत 15 हजार कोटींहून अधिकचा निधी दिल्याचे त्यांनी सांगितले. तसेच राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी अशा मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गातून सर्वाधिक विकास मराठवाड्याचा होणार असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्याच्या विकासावर आधारित 'अग्रेसर मराठवाडा' या पुस्तिकेचे प्रकाशन केले.