Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Friday, 4 April 2025
webdunia

खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी भाजपच्या दोन नेत्यांना नोटीस पाठवली

MP Priyanka Chaturvedi sent notices to two BJP leaders  खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी भाजपच्या दोन नेत्यांना नोटीस पाठवली Maharashtra News Regional Marathi News In Webdunia Marathi
, बुधवार, 8 डिसेंबर 2021 (21:03 IST)
शिवसेनेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी भाजपच्या दोन नेत्यांना नोटीस पाठवली आहे. भाजपचे आमदार आशिष शेलार आणि अतुल भातखळकर यांनी माझी प्रतिमा मलिन केल्याचा आरोप केलाय, अशाप्रकारची कायदेशीर नोटीस चतुर्वेदी यांनी पाठवली आहे. तसेच भाजपच्या दोन्ही नेते आशिष शेलार आणि अतुल भातखळकर यांनी आपली बिनशर्त माफी मागावी, असे म्हटले आहे. 
आशिष शेलार यांनी एका पत्रकार परिषदेत प्रियांका चतुर्वेदी यांच्या विधानाची मोडतोड केली होती. त्यानंतर ते सादर केले होते. आम्ही सावरकरांप्रमाणे माफी मागणार नाही. असं आशिष शेलार यांनी प्रियांका चतुर्वेदी यांना सांगितलं होतं. तसेच स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान असून त्यांनी माफी न मागितल्यास आम्ही राज्यव्यापी आंदोलन छेडू, असा इशारा शेलार यांनी चतुर्वेदी यांना दिला होता. परंतु शेलार यांच्या आरोपांमुळे इतक्या वर्षाची प्रतिमा मलीन झाली. असं नोटमध्ये लिहिलं असून भाजपच्या दोन्ही नेत्यांनी चतुर्वेदींची लेखी माफी मागावी, अशी मागणी नोटीसमधून केली होती.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राज्यात थंडी वाढण्यास सुरुवात, पुणेकरही थंडीने गारठले