Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

श्रीरामपूरातील बिबट्याच्या हल्ल्यातील जखमी वनरक्षकाचा मृत्यू

webdunia
बुधवार, 8 डिसेंबर 2021 (15:39 IST)
श्रीरामपूर येथे धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला जेरबंद करताना जखमी झालेले वनरक्षक लक्ष्मण गणपत किनकर यांचे खासगी रुग्णालयात उपचार घेताना झाले निधन आहे.
गेल्या चार दिवसांपूर्वी श्रीरामपूर शहरात भर लोकवस्तीत बिबट्याने धुमाकून घातला होता. बिबट्याच्या हल्ल्यात अनेक जण जखमी झाले होते.
बिबट्याला पकडण्यासाठी जिल्ह्यातील वनविभागाचे तसेच स्थानिक प्रशासनाच्यावतीने अथक मेहनत घेण्यात आली. तीन तासानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात आले.
दरम्यान बिबट्याने मांडीला चावा घेतल्याने राहुरी वनविभागातील वनरक्षक लक्ष्मण किनकर यांना नगर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. किनकर हे राहुरी तालुक्यातील ताहाराबाद येथील रहिवासी असून त्यांच्या निधनाने राहुरी तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बिपीन रावत कोण आहे, जाणून घ्या त्यांच्याबद्दल खास गोष्टी