नाथाभाऊंनी (एकनाथ खडसे) परत आलं पाहिजे. पक्षात अशाप्रकारच्या लिडरशीपची गरज आहेच, अशी ऑफर भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी दिली. एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत विनोद तावडे यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.
विनोद तावडे म्हणाले, नाथाभाऊंसारख्या ज्येष्ठ लोकांनी परत यावं. पण येताना ते ज्या पद्धतीने स्पष्टपणे बोलतात ते अपेक्षित नाही. जी जी माणसं पक्षात आली पाहिजे असं आम्हाला वाटतं त्यात नाथाभाऊ आहेत. कारण त्यांना ग्रामीण महाराष्ट्राची चांगली ओळख आहे.
खडसे परत येणार असतील तर फडणवीस हे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखऱ बावनकुळे आणि अन्य नेत्यांशी बोलून योग्य तो निर्णय घेतील. परत आल्यानंतर खडसे यांनी भाजपच्या शिस्तीचे पालन करायला हवे. भाजपवापसी संदर्भात माझे खडसे यांच्याशी किंवा पक्षश्रेष्ठींशी माझे बोलणे झालेले नाही, असेही विनोद तावडे यांनी स्पष्ट केले.
विनोद तावडे यांनी मुलाखतीत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचीही आठवण करुन दिली. ज्यांच्यावर अन्याय होतो, त्यांच्याकडे संयम असायला हवा. विलासराव देखमुख यांना विधानपरिषदेसाठी भाजपने मदत केली. शिवसेनेने मदत केली नाही. शिवसेनेने मदत केली असती तर निवडून पण आले असते. सन २००४ ला झाले ना ते मुख्यमंत्री, असे विनोद तावडे यांनी मुलाखतीत सांगितले.
Edited By- Ratnadeep Ranshoor