भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट केल्या प्रकरणात पाथर्डी, शिरूर शहर बंद केल्यानंतर आज रविवारी 9 जून रोजी परळी शहर बंद करण्यात आले असून सोमवारी 10 जून रोजी वडवणी बंद पुकारण्यात आले आहे. हा बंद ओबीसी आणि वंजारी समाजाच्या वतीने पुकारण्यात आले आहे.
प्रकरण काय आहे
परळी येथे एका व्यक्तीने सोशल मीडियाच्या माध्यमाने पंकजा मुंडे यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आली असून त्यांच्या विरोधात परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला तसेच या प्रकरणी संबंधिताला अटक केली. या नंतर अहमदनगरच्या पाथर्डी तालुक्यात शिरपूर येथे महेश नावाच्या इसमाने पंकजा मुंडे यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट केली. या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
तसेच शिरूर तालुक्यात रायमोहा या ठिकाणी देखील पंकजामुंडे यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट केली आहे. या घटनेचा निषेध म्हणून ओबीसी आणि वंजारी समाजाच्या बांधवांनी शिरूर, परळी शहरात बंद पुकारले आहे. या घटनेमुळे बीड मध्ये तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे.
हे प्रकरण परळी पासून सुरु झाले आहे. गुहेगारांवर कारवाई करण्याच्या मागणी करत याद्या वडवणी येथे ओबीसी आणि वंजारा समाजाने बंद पुकारले आहे.